Breaking news

शांता सिद्धी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने लोकमान्य टिळक विद्यालय नांगरगाव येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य व रेनकोटचे वाटप

लोणावळा : शांता सिद्धी चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने लोणावळा नगर परिषदेच्या लोकमान्य टिळक विद्यालय, नांगरगाव येथील विद्यार्थ्यांना 21 जून रोजी स्कूल बॅग, रेनकोट, नोटबुक, टिफिन बॉक्स, पाण्याच्या बाटल्या आदी साहित्य वाटप करण्यात आले. 

     यावेळी डॉ. पी. एस. रमाणी, वर्ल्ड न्यूरो स्पाइनल सर्जन श्रीमती प्रतिमा रमाणी, ट्रस्टचे मानद सचिव भूषण जॅक, वैभव दुर्गे, लोणावळा शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती प्रदीप थत्ते, प्राचार्या श्रीमती नीता पवार, श्रीमती स्वाती येवले, श्रीमती शुभांगी पालकर, श्रीमती नीलम कडाळे, नांगरगाव येथील इतर मान्यवर तसेच एस. एम. भागवत, नांगरगाव औद्योगिक वसाहतीचे अध्यक्ष संदीप कोरड, मनशक्ती केंद्राचे विश्वस्त प्रमोद भाई शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

     मागील चार वर्षांपासून शांता सिद्धी चॅरिटेबल ट्रस्ट शाळेला वरील वस्तू पुरवत आहे. यापूर्वी ट्रस्टने शाळेला लॅपटॉप, सिलिंग फॅन, खुर्च्या, पाण्याचे भांडे, साउंड सिस्टम प्रदान केले आहे.

इतर बातम्या