Breaking news

अजय मामा शिराली यांचे निधन

लोणावळा :  कार्ला  येथील श्री दुर्गा परमेश्वरी मंदिर श्री ट्रस्टचे मुख्य व्यवस्थापक अजय शिराली यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. 

    परिज्ञानाश्रमात स्वामीं समाधीची सेवा,  कार्ला येथे विद्यार्थी वर्गाकरिता परीज्ञानाश्रम नावाचे विकास घर निर्मिती यामध्ये त्यांचे मोलाचे योगदान होते. परीज्ञानाश्रम विद्यालय इंग्रजी माध्यम शाळा उभारणीतही त्यांचे मोलाचे योगदान होते. त्यांच्या प्रयत्नातून कार्ला एकवीरा मंदिर येथे प्रयोगशाळा निर्मिती झाली आहे. कार्ला परिसरात सामाजिक काम, शासकीय उपक्रम यात ते सक्रिय असत. गोरगरीब विद्यार्थ्यांचे कल्याण व्हावे म्हणून त्यांचे शैक्षणिक शुल्क ते स्वतः भरत असत. श्री एकविरा जोगेश्वरी सामुदायिक विवाह सोहळा समितीचे ते संस्थापक होते.

     त्यांचे पश्चात पत्नी श्रीमती सीमा, पुत्र रौनक व सून विजिता असा परिवार आहे.

इतर बातम्या