मावळवासीयांसाठी दिलासादायक बातमी : कान्हे फाटा येथे 15 मेपासून मोफत डायलिसीस सेवा सुरू – आमदार सुनील शेळके

वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील मूत्रपिंड विकारांनी ग्रस्त रुग्णांसाठी एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक सेवा सुरू होत आहे. उपजिल्हा रुग्णालय, कान्हे येथे 15 मे 2025 पासून मोफत डायलिसीस उपचार उपलब्ध होणार असून, ही सेवा सोमवारी ते शुक्रवारी सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत सुरु राहणार आहे.
ही सुविधा सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन, आमदार सुनील शेळके, पॉस्को, रोटरी क्लब ऑफ तळेगाव दाभाडे आणि जी. के. फाउंडेशन, पुणे यांच्या संयुक्त प्रयत्नातून सुरु केली जात आहे.
उपचारासाठी सूचना :
1} उपचारासाठी येण्यापूर्वी 8080346234 वर संपर्क साधून अपॉइंटमेंट घ्यावी.
2} रुग्णांनी येताना वैद्यकीय कागदपत्रे, रेशन कार्ड आणि आधार कार्डाची झेरॉक्स प्रत सोबत आणावी.
या उपक्रमासाठी मावळचे आमदार मा. सुनिल शंकरराव शेळके यांचे विशेष सहकार्य लाभले आहे. त्यांच्या पुढाकारामुळे मावळ परिसरातील रुग्णांना स्थानिक स्तरावर सुसज्ज व मोफत उपचाराची सोय उपलब्ध झाली आहे. मावळमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांसाठी ही सेवा फार मोठा आधार ठरणार असून, गरजूंनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.