भारताचे उपराष्ट्रपती श्री सी.पी. राधाकृष्णन यांची कैवल्यधाम योग संस्थेचे मानद सचिव सुबोध तिवारी यांनी नवी दिल्ली येथे घेतली भेट
लोणावळा : जागतिक ख्याती असलेल्या लोणावळ्यातील कैवल्यधाम योग संस्थेचे मानद सचिव व प्रमुख कार्यकारी अधिकारी आणि इंडियन योग असोशिएशन चे सरचिटणीस श्री सुबोध तिवारी यांनी माजी कॅबिनेट मंत्री आणि कैवल्यधाम ग्लोबलचे अध्यक्ष श्री सुरेश प्रभू यांच्या समवेत नुकतीच भारताचे माननीय उपराष्ट्रपती श्री सी.पी. राधाकृष्णन यांची नवी दिल्ली येथे भेट घेतली आणि त्यांना शाल आणि “इंडियन योग असोशियन चे कॉफी टेबल बुक भेट देऊन सन्मानित केले.
भारताच्या माननीय उपराष्ट्रपतींची भेट घेऊन आनंद झाला आहे, असे या भेटीविषयी बोलताना श्री सुबोध तिवारी म्हणाले. या भेटी दरम्यान त्यांनी लोणावळ्यातील कैवल्यधाम योग संस्थेला भेट देण्याचे निमंत्रण उपराष्ट्रपतींना दिले. तसेच त्यांना येत्या सप्टेंबर महिन्यात साज-या होणाऱ्या कैवल्यधाम योग संस्थेच्या गोर्धनदास सेक्सरिया योग महाविद्यालयाच्या अमृत महोत्सव सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित केले आहे.
























