Breaking news

Lions Club Of Lonavala Khandala l मंगेश कदम यांनी स्वीकारला लायन्स क्लब ऑफ लोणावळा खंडाळा च्या अध्यक्ष पदाचा पदभार; माजी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर गिरीश मालपाणी यांची प्रमुख उपस्थिती

लोणावळा : लायन्स क्लब ऑफ लोणावळा खंडाळ्याच्या अध्यक्षपदी मंगेश कदम यांची बिनविरोध निवड झाली असून मंगेश कदम यांनी आपल्या पदाचा पदभार माजी डिस्ट्रिक्ट गवर्नर गिरीश मालपाणी यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वीकारला. छत्रपती शिवाजी महाराज व स्वराज्य ही थीम घेत सदरचा पदग्रहण सोहळा शिवमय वातावरणात मंगळवारी पार पडला. या निमित्त लोणावळा खंडाळा लायन्स क्लबचा 32 वा पदग्रहण सोहळा पार पडला.

      2026 27 या वर्षाकरिता लायन्स क्लब ऑफ लोणावळा खंडाळा ची नूतन कार्यकारणी यावेळी घोषित करण्यात आली आहे. यामध्ये राजेश राजपूत यांच्यावर सचिव पदाची तर रोहित थोरात यांच्यावर खजिनदार पदाची महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे. 

     कांता ओसवाल (IPP), मनोज लुंकड (सह खजिनदार), प्रकाश जैन (प्रथम उपाध्यक्ष), आशिष पाऊण (द्वितीय उपाध्यक्ष), सीमा पारेख (तृतीय उपाध्यक्ष), विरल गाला (क्लब सर्विस चेअरपर्सन), साजिया समशी (क्लब LCIF कॉर्डिनेटर), डॉक्टर दिलीप सुराणा (PRO), सागर लुणावत (GLT), अमित लुणावत (GMT), अश्विनी कदम (Tail Tamer), सुरुची खंडेलवाल (Tail Twister) 

बोर्ड ऑफ डायरेक्टर : जयश्री सुराणा, कांता ओसवाल, रिंपल पटवा, रंजू लुणावत, एडवोकेट दीप्ती लुणावत, डॉक्टर रितेश खंडेलवाल, कोमल जैन, प्रीतम लुंकड, कोमल शिंदे. 

ऍक्टिव्हिटी चेअरपर्सन : जुबेर समशी, आशिष पॉन, मनोज लुंकड, प्रकाश जैन, एडवोकेट राजू शिंदे. 

सोशल मीडिया चेअरपर्सन : एडवोकेट प्रफुल लुंकड 

सल्लागार समिती : वीरेंद्र पारेख, अमित लुणावत, डॉक्टर पोपट ओसवाल, डॉक्टर दिलीप सुराणा, देवेंद्र नेलेकर.

     यावेळी बोलताना नूतन अध्यक्ष मंगेश कदम म्हणाले, सेवा, सहकार्य व संस्कार या त्रिसूत्रीवर वर्षभर काम करणार आहे. यामध्ये दर महिन्याला आरोग्य शिबिर, नेत्र तपासणी, मधुमेह शिबिर, रक्तदान शिबिर घेतली जाणार आहे. पर्यावरण रक्षणासाठी 1 हजार झाडे लावण्याचा संकल्प आहे. तसेच गरजू विद्यार्थी शिक्षवृत्ती, गरजूंना अन्नधान्य वाटप ही कामे करायची आहेत. ही कामे मी एकटा करू शकत नाही, याकरिता सर्व लायन्स सदस्यांचे सहकार्य गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. पद ही केवळ मिरवण्यासाठी नसून ते समाजाची सेवा करण्याचे साधन असल्याचे त्यांनी सांगितले. आपण लायन आहोत, आपली डरकाळी सर्वसामान्यांच्या मदतीसाठी आहे, दुर्बलांना सावरण्यासाठी आहे असा महत्वाचा संदेश त्यांनी आपल्या मनोगतात व्यक्त केले. यावेळी छत्रपती शिवराय सामुदायिक विवाह सोहळा समिती व नरेश खोंडगे यांना सेवा सद्भावना पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. दिपाली गाला, निराली नाळेकर, स्नेहलता माळी, कैलास माळी, देवल पारेख, अभय जैन, चारमी पारेख, जिगर पटवा आदी उपस्थित होते.

लायन्स क्लब एक्सेलांस अवॉर्ड डॉ. पोपटी ओसवाल, लायन्स बेस्ट सेक्रेटरी व ॲंकर अवाॅर्ड लायन निराली नाळेकर यांना माजी अध्यक्षा लायन कांता ओसवाल यांनी दिला.

इतर बातम्या