Lonavala Breaking News : लोणावळ्यात हरविलेल्या त्या अभियंत्याचा मृतदेह सापडला

लोणावळा : दिल्ली येथील एक अभियंता लोणावळ्यात गिरीभ्रमंतीसाठी आला असता ड्युक्स नोज परिसरातून शुक्रवारी दुपारी मिसिंग झाला होता. आज सकाळी त्याचा मृतदेह मिळून आला आहे. आयएनएस शिवाजीच्या पथकाला हा मृतदेह मिळून आला. फरहान अहमद (वय 24, रा. दिल्ली) हा युवक शुक्रवारी दुपारी दोन पासून तो बेपत्ता झाला असून सलग चार दिवस त्याचा विविध पद्घतीने शोध सुरु होता. मात्र तो मिळून न आल्याने त्याल शोधून देणार्याला 1 लाख रुपयांचे बक्षिस ठेवण्यात आले आहे.
फरहान अहमद हा दिल्ली येथील अभियंता काही शासकीय कामासाठी कोल्हापूरला गेला होतो. एका रोबोट बनविण्याच्या कंपनीत तो काम करतो. त्याला गिर्यारोहणाचा आवड असल्याने कोल्हापूर व पुणे येथील काम उरकल्यानंतर तो लोणावळ्यात आला होता. शुक्रवारी ड्युक्स या ठिकाणी तो फिरायला गेला असताना, त्याला आपण रस्ता चुकलो असून भरकटल्याचे समजल्यानंतर त्याने भावाला फोन करून रस्ता चुकलो असल्याची माहिती दिली होती. त्यानंतर काही वेळात त्याचा मोबाईल बंद झाला होता. त्याच्या भावाने काही मित्रांच्या मदतीने लोणावळा पोलिसांशी संपर्क साधत याबाबतची माहिती दिली. शुक्रवारी दुपारी दोन पासून तो गायब आहे. ही माहिती समजल्यानंतर लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक सिताराम डुबल यांच्यासह पोलीस ठाण्यातील कर्मचारी, शिवदुर्ग मित्र या रेस्कू पथकातील स्वंयसेवक, वन्यजीव रक्षक समिती मावळ या रेस्कू पथकातील स्वंयसेवक, खोपोली येथील यशवंती हायकर्स सदस्य व कुरवंडे गावातील तरुण त्यांनी शोध घेत होती. आज सकाळी आयएनएस शिवाजीचे जवान व एनडीआरएफ ची टिम शोधार्थ दाखल झाली होती. यापैकी आयएनएस शिवाजी पथकानाला सदरची बाॅडी निदर्शनास आली. यानंतर शिवदुर्गचे पथक, पोलीस व अन्य समित्यांचे कार्यकर्ते दरीत खाली उतरत त्यांनी सदर मृतदेहाची ओळख पटवत तो रेल्वे बोगदा भागातून वर काढण्याचे काम सुरु आहे. दोन दिवस पोलिसांनी श्वान पथकाच्या द्वारे देखील शोध मोहिम राबवली. उंच डोंगर व दर्या त्यामध्ये घनदाट झाडी असा हा परिसर असल्याने शोध मोहिमेत अडचणी येत असल्यातरी सर्व पथके चार दिवस सातत्यपूर्ण प्रयत्न करत होती.