अमोल शेडगे यांनी दिला काँग्रेस परिवहन तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा

लोणावळा : येथील अमोल परशुराम शेडगे यांनी त्यांच्या मावळ तालुका काँग्रेस परिवहन अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस परिवहन विभागाचे पुणे जिल्हाध्यक्ष मोहसीन तांबोळी यांच्याकडे हा राजीनामा पाठविण्यात आला आहे.
वैयक्तिक कारणास्तव राजीनामा देत असल्याचे शेडगे यांनी राजीनामा पत्रात म्हटले आहे. मागील दीड वर्षापासून ते ह्या पदावर कार्यरत होते. पदाचा राजीनामा दिला असला तरी पक्ष संघटनेत पूर्ण निष्ठेने कार्यरथ राहणार असल्याचे त्यांनी या राजीनामा पत्रात म्हटले आहे.