Breaking news

शिवसेना शहरप्रमुख संजय भोईर यांच्या पाठपुराव्याला यश : लोणावळा रेल्वे स्थानकावरील दोन्ही तिकीट काउंटरवर आता UPI सह कॅश सुविधाही उपलब्ध

लोणावळा : शिवसेना लोणावळा शहरप्रमुख संजय भोईर यांनी प्रवाशांच्या सुविधांसाठी सातत्याने केलेल्या मागणीला अखेर यश आले आहे. लोणावळा शहर व परिसरातील हजारो रेल्वे प्रवासी, कामगार, विद्यार्थी, दुग्ध व्यवसायिक आणि महिला भगिनी यांना भेडसावत असलेली तिकीट खरेदीतील अडचण दूर झाली आहे.

संजय भोईर यांच्या पाठपुराव्यानंतर मंडळ रेल्वे व्यवस्थापक (वाणिज्य विभाग), मुंबई यांनी तात्काळ दखल घेत संबधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. यानुसार लोणावळा रेल्वे स्थानकावरील प्लॅटफॉर्म क्रमांक 01 व 03 वरील तिकीट घरांमध्ये दोन्ही काउंटरवर आता रोख (Cash) व यूपीआय (UPI) द्वारे भरणा करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या निर्णयामुळे स्थानिक प्रवाशांना तिकीट घेण्यासाठी लागणारा वेळ व गैरसोयीचा त्रास कमी होणार आहे. संजय भोईर यांनी यासाठी सातत्याने रेल्वे प्रशासनाशी पत्रव्यवहार करत आवाज उठवला होता. त्यांच्या या लोकहितार्थ प्रयत्नाचे लोणावळा परिसरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे.

इतर बातम्या