Breaking news

Lonavala News l बोरजमध्ये गावठी हातभट्टीवर लोणावळा ग्रामीण पोलिसांचा छापा; २ हजार लिटर कच्चे रसायन जागीच नष्ट

लोणावळा : बोरज (ता. मावळ) गावच्या हद्दीतील गायरान परिसरात सुरू असलेल्या अवैध गावठी हातभट्टीवर लोणावळा ग्रामीण पोलिसांनी धडक कारवाई केली. या कारवाईत तब्बल २ हजार लिटर गावठी हातभट्टीचे कच्चे रसायन पोलिसांच्या हाती लागले. हे रसायन पोलिसांनी जागीच नष्ट केले आहे.

        पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, १५ सप्टेंबर २०२६ रोजी बोरज गावच्या हद्दीतील गायरानात दाट झाडाझुडपांचा फायदा घेत काही इसम अवैध गावठी हातभट्टी चालवत असल्याची गुप्त माहिती पोलीस उपअधीक्षक भूषण माने यांना मिळाली होती. या मिळालेल्या माहितीची खातरजमा करून पोलिसांनी तातडीने पथक तयार केले आणि संबंधित ठिकाणी छापा टाकला. यावेळी गायरान परिसरात लपवून ठेवलेले सुमारे २,००० लिटर कच्चे रसायन आढळून आले.

        या कारवाईमुळे बोरज परिसरातील अवैध हातभट्टी व्यवसायाला मोठा धक्का बसला आहे.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक भूषण माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया म्हेत्रे, पोलीस उपनिरीक्षक नाथा केकान, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक प्रकाश वाघमारे तसेच पोलीस अंमलदार जय पवार, नितीन कदम, संतोष वाडेकर, अक्षय देवकते, यश देसाई आणि ऋषीकेश अभंग यांच्या पथकाने केली.

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीपसिंग गिल, अपर पोलीस अधीक्षक डॉ. शुभम कुमार आणि लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

        दरम्यान, मावळ परिसरात अवैध गावठी हातभट्टीसह बेकायदेशीर धंद्यांविरोधात कारवाई सुरू असून, अशा प्रकारच्या गैरकायदेशीर कृत्यांना आळा घालण्यासाठी यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

इतर बातम्या