लोणावळा शहरात शिवसेना जाहीर पक्ष प्रवेश व खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते नवनियुक्त पदाधिकारी नियुक्ती पत्रे वाटप

लोणावळा : शिवसेनेचे मुख्य नेते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आज१९ मे रोजी लोणावळ्यातील एव्हीयन हॉटेल येथे मावळ लोकसभेचे खासदार महा संसदरत्न श्रीरंग आप्पा बारणे यांच्या उपस्थित व हस्ते लोणावळा शहर व मावळ ग्रामीण भागातील नवीन पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रे वाटप करण्यात आली. तसेच अनेकांना शिवसेनेत जाहीर प्रवेश देण्यात आला. MPSC महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षेत उत्तीर्ण झालेली लोणावळ्यातील कु. मोनिका बाळासाहेब झरेकर व इयत्ता 10 वी च्या परीक्षेमध्ये 99.20 टक्के गुण मिळवून मावळ तालुक्यात प्रथम क्रमांकानी उत्तीर्ण झालेली कु. गौरी गणेश शिंदे या दोघींना खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
कामशेत शहराचे उबाठा गटाचे शहर प्रमुख सतीश इंगवले, उबाठा गटाच्या लोणावळा शहरातील महिला आघाडी जेष्ठ उपशहर संघटिका प्रभाताई अकोलकर, कांताताई मोरे, सावळा गावचे उपसरपंच जालिंदर भोईर, उप विभाग संघटिका देवयंती (स्विटी) सिंग, युवती सेनेच्या प्रज्ञा सरावते, उबाठा गटाचे गणेश युवरे तसेच इतर पक्षांचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मोठ्या संख्येने शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश घेण्यात आला. या कार्यक्रमास खासदार श्रीरंग बारणे यांनी सर्व पदाधिकारी व शिवसैनिकांना पक्ष संघटना मजबूत करणेकामी व आगामी येणाऱ्या निवडणुकीसंदर्भात मोलाचं मार्गदर्शन केले. मावळ तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, मावळ तालुका संघटक अमित कुंभार यांनी सुद्धा आपली मनोगत व्यक्त केली. सुत्रसंचालन शिवसेना शहरप्रमुख संजय भोईर यांनी केले व आभार नवनियुक्त उपतालुकाप्रमुख प्रकाश पाठारे यांनी केले.
या याप्रसंगी शिवसेना उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, उपतालुका प्रमुख राम सावंत, तालुका संघटक मदन शेडगे, युवासेना तालुका अधिकारी विशाल हूलावळे, महिला आघाडी तालुका संघटक शुभांगीताई काळंगे, महिला आघाडी शहर संघटक मनिषाताई भांगरे, उपशहर संघटिका दिपाली शिरंबेकर, मा. नगरसेविका नव नियुक्त महिला आघाडी तालुका समन्वयक कल्पनाताई आखाडे, मा. नगरसेविका महिला आघाडी उप तालुका संघटिका सिंधूताई परदेशी, उपशहर प्रमुख विशाल पाठारे, समन्वयक नंदुभाऊ कडू, युवासेना शहर अधिकारी विवेक भांगरे, सल्लागार राजूभाऊ चव्हाण, सल्लागार पराग राणे, उपविभागप्रमुख कु. वरसोली गट नरेश घोलप, उत्तर भारतीय सेल चे अध्यक्ष दिलीप दुबे, विभागप्रमुख प्रसाद कन्नन, उपविभागप्रमुख केतन फाटक, शाखाप्रमुख परेश वावळे, शाखाप्रमुख यशोधन शिंगरे, विभागप्रमुख सहादू बडेकर, नव नियुक्त उपशहर प्रमुख विजय आखाडे, उपशहर प्रमुख मंगेश येवले, सल्लागार अनिल कालेकर, महिला आघाडी उपशहर संघटिका प्रियाताई पवार, उपशहर संघटिका अनिता ताई गायकवाड, नवनाथ हारपुडे, वाहतूक सेना शहराध्यक्ष कल्पेश तिखे, मावळ तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी लोणावळा शहरातील विभाग प्रमुख, उपविभाग प्रमुख, शाखाप्रमुख, पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.