Breaking news

Lonavala News l लोणावळा शहरात पथ विक्रेता समिती जाहीर; 21 जणांचा समावेश

लोणावळा : लोणावळा शहरातील पथ विक्रेता समिती मंत्रालयातून जाहीर करण्यात आली आहे. या समितीची पहिली बैठक आज लोणावळा नगर परिषदेत पार पडली. लोणावळा शहरात फेरीवाला धोरण राबविणे तसेच महाराष्ट्र पथ विक्रेता उपजीविका संरक्षण व पथ विक्री याबाबत धोरण ठरविण्याचे काम ही समिती करणार आहे.

 लोणावळा पथ विक्रेता समिती 

शासकीय विभाग – मुख्याधिकारी लोणावळा नगरपरिषद - अध्यक्ष, पोलीस निरीक्षक लोणावळा शहर – सदस्य, स्थानिक प्रभारी वाहतूक पोलीस अधिकारी – सदस्य, वैद्यकीय अधिकारी – सदस्य, विशेष नियोजन प्राधिकरण प्रतिनिधी – सदस्य

पथ विक्रेता प्रतिनिधी – अशोक कदम, धनराज लांघे, आकाश परदेशी, श्रीमती मुस्कान लतिफ शेख, सुजाता रमेश म्हाळसकर, निर्मला वसंत पांगरे, गणेश चव्हाण, संदीप पोटफोडे 

अशासकीय संघटना – प्रफुल्ल काकडे व नरेश खोंडगे 

पणन संघाचा प्रतिनिधी – हर्षल होगले 

जिल्हा अग्रणी बँक प्रतिनिधी – बँक ऑफ महाराष्ट्र शाखेचे व्यवस्थापक 

अशी समिती मंत्रालयातून अधिसूचित करण्यात आली असून त्यामध्ये निमंत्रित सदस्य म्हणून वसंतराव काळोखे, गणेश काळडोके, लक्ष्मण दाभाडे, महादेव जगताप, ताजुद्दीन शेख यांचा समावेश करण्यात आला आहे.

   पथ विक्रेता समिती स्थापन झाल्यामुळे आता पथ विक्रेते यांचे प्रश्न मार्गी लागण्याची आशा पल्लवित झाली आहे.

इतर बातम्या