Breaking news

मावळ तालुका शिवसेनेतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा वडगाव मावळ येथे गौरव समारंभ उत्साहात संपन्न

वडगाव मावळ (प्रतिनिधी) : मावळ तालुका शिवसेनेच्या वतीने दहावी व बारावीच्या परीक्षेत प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त करणाऱ्या विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभ वडगाव मावळ येथे उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला मावळ लोकसभेचे लोकप्रिय खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

    कार्यक्रमाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांचे यश साजरे करत, त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देताना खासदार बारणे म्हणाले, "अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण होतो आणि प्रेरणादायी वातावरण तयार होते. शिवसेना नेहमीच गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करत आली आहे."

     या सोहळ्याला गटशिक्षणाधिकारी सुदाम वाळुंजकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख शरद हुलावळे, माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी, तालुका प्रमुख राजाभाऊ खांडभोर, माजी कॅन्टोन्मेंट सदस्य रघुवीर शेलार आदी मान्यवरांसह शिवसेनेचे अमित कुंभार, राम सावंत, सोमनाथ कोंडे, धनंजय नवघणे, मदन शेडगे, दत्ता केदारी, विशाल हुलावळे, राजेश वाघोले, सुनील हगवणे, प्रवीण ढोरे, कल्पना आखाडे, नितीन देशमुख, योगेश खांडभोर, आर्यन खांडभोर तसेच लोणावळा महिला शहर संघटिका मनीषा भांगरे यांचीही विशेष उपस्थिती लाभली.

     कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन करण्यात आले असून पालक व ग्रामस्थांनीही याचे कौतुक केले. युवासेना मावळतर्फे या यशस्वी आयोजनासाठी सर्वांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

इतर बातम्या