Breaking news

कुसगाववाडी येथील काकडा सोहळ्याची हभप गोरख महाराज बनकर यांच्या काल्याच्या कीर्तनाने सांगता

लोणावळा : लोणावळा शहरा लगत असलेल्या कुसगाववाडी येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये कोजागिरी पौर्णिमेपासून सुरू झालेल्या काकडा आरती सोहळ्याची सांगता गुरुवारी 26 नोव्हेंबर रोजी हभप गोरख महाराज बनकर यांच्या कार्याच्या कीर्तनाने झाली.

भक्तीचिया पोटी बोध काकडा ज्योती l पंचप्राण जीवे भावे ओवाळू आरती ll ओवाळू आरती माझ्या पंढरीनाथा l दोन्हीकडे जोडूनी चरणी ठेवीन माथा ll या अभंगाप्रमाणे कोजागिरी पौर्णिमा ते त्रिपुरारी पौर्णिमा असा महिनाभर काकड आरती सोहळा पहाटे चार वाजता मंदिरामध्ये होत असे. कुसगाववाडी कुसगाव डोंगरगाव व पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने या काकड आरती सोहळ्यामध्ये पहाटे सहभागी होत असत.

काकडा आरती सोहळ्याच्या निमित्त मंगळवार 24 नोव्हेंबर रोजी पहाटे चार वाजता काकड आरती, सायंकाळी चार वाजता हरिपाठ, सायंकाळी सहा ते नऊ या वेळेमध्ये महिलांसाठी खेळ रंगला पैठणीचा तर रात्री नऊ नंतर नाथ सेवेकरी भजनी मंडळ यांचा सदाबहार गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 25 नोव्हेंबर रोजी दुपारी बारा ते दोन या वेळेमध्ये महिलांसाठी हळदीकुंकू सोहळा, दुपारी तीन वाजता सत्यनारायण महापूजा, सायंकाळी हरिपाठ व त्यानंतर ह भ प समाज प्रबोधनकार चंद्रकांत महाराज खळेकर यांचे कीर्तन, तदनंतर महाप्रसाद व हरिजागर दिनक्रम आयोजित करण्यात आला होता. 26 नोव्हेंबर रोजी पहाटे चार वाजता काकड आरती, सकाळी सात वाजता दिंडी पालखी मिरवणूक व दहा वाजता हभप गोरख महाराज बनकर यांचे काल्याचे किर्तन पार पडले. त्यानंतर सर्व भाविकांसाठी महाप्रसाद भंडारा व निर्माल्य विसर्जन पार पडले. कुसगाव वडील ग्रामस्थांच्या वतीने काकडा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

इतर बातम्या