Breaking news

मावळ तालुक्यातील वडिवळे धरणातून 3977 क्युसेक्स तर कासारसाई धरणातून 2040 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग

मावळ माझा न्युज नेटवर्क : मावळ तालुक्यात व घाटमाथ्यावर सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे मावळातील धरणे जून महिन्यातच पूर्ण भरण्याच्या मार्गावर असून मावळातील वडिवळे धरणातून 3977 क्युसेक्स वेगाने तर कासारसाई धरणातून 2040 क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला असल्याची माहिती पुणे पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आली. पावसाचा जोर कमी/जास्त राहिल्यास त्याप्रमाणे विसर्ग देखील कमी/जास्त करावा लागणार आहे. वडिवळे धरणातून कुंडली नदीत तर कासारसाई धरणातून कासारसाई नालापात्रात हा विसर्ग सुरू असून नागरिकांनी काळजी घ्यावी. नदीपात्रालगत जाऊ नये असे आवाहन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे.

इतर बातम्या