डॉ. डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस वराळे मध्ये अभियांत्रिकी आणि एम.सी.ए. प्रवेशासाठी मोफत सुविधा व करिअर मार्गदर्शन केंद्र

तळेगाव दाभाडे : डॉ. डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस, वराळे, तळेगाव दाभाडे येथे अभियांत्रिकी (Engineering) व एम.सी.ए. (MCA) शिक्षण घेण्याची इच्छुक विद्यार्थ्यांसाठी मोफत सुविधा व करिअर मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यात आले आहे. बारावी तसेच सीईटी व जेईई परीक्षांचे निकाल नुकतेच जाहीर झाले असल्याने विद्यार्थ्यांना योग्य करिअर निवडीसाठी हे केंद्र उपयुक्त ठरणार आहे.
या केंद्रामार्फत विद्यार्थ्यांना विविध अभियांत्रिकी शाखांबाबत सखोल माहिती, कॉलेज निवडताना लक्षात ठेवावयाचे मुद्दे, कॅम्पस प्लेसमेंट कसे होतात याविषयीचे मार्गदर्शन आणि सर्वांगीण विकासासाठी आवश्यक गोष्टी यासंदर्भात तज्ज्ञ प्राध्यापकांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.
“विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा हे त्यांनी ठरवायचे असते. मात्र, योग्य निर्णय घेण्यासाठी सक्षम मार्गदर्शन अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे डॉ. डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पसच्या करिअर मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधावा,” असे आवाहन प्राचार्य डॉ. एस. डी. शिरबहादुरकर यांनी केले आहे. विद्यार्थी आणि पालकांनी या मोफत केंद्राला भेट देऊन आपले शंकानिरसन करून घ्यावे आणि उज्ज्वल भविष्याच्या दिशेने योग्य वाटचाल करावी, असे आवाहन महाविद्यालय प्रशासनाने केले आहे.
संपर्कासाठी दूरध्वनी क्रमांक : 7666720378 / 7666829653 / 7822099218 / 9359004652