Breaking news

Maval News l तीर्थक्षेत्र श्री पोटोबा देवस्थानच्या 15 व्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन

वडगाव मावळ : मावळ तालुक्यातील श्रद्धास्थान असलेल्या तीर्थक्षेत्र श्री पोटोबा महाराज देवस्थान संस्थानचा 15 वा वार्षिक अहवाल रविवारी, दिनांक 15 जून 2025 रोजी मोठ्या उत्साहात प्रकाशित करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन श्री पोटोबा महाराज मंदिरात करण्यात आले होते.


       कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे होते. यावेळी ह.भ.प. मंगल महाराज जगताप, संतोष महाराज काळोखे, नितीन महाराज काकडे, तसेच उद्योजक शंकरराव शेळके, मावळ तालुका दिंडी मंडळाचे अध्यक्ष महादुबुवा सातकर आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते.

     यावेळी भंडारा डोंगर दशमी समितीचे अध्यक्ष ह.भ.प. बाळासाहेब काशिद यांनी, “श्री पोटोबा देवस्थान पुणे जिल्ह्यातील एक पारदर्शक कारभार करणारे आदर्श देवस्थान आहे,” असे गौरवोद्गार काढले. वारकरी संप्रदायाने या देवस्थानच्या पारदर्शक कारभारातून प्रेरणा घेत व्यसनमुक्त व सुखी मावळ घडवावा, असे मार्गदर्शन ह.भ.प. संतोष महाराज काळोखे यांनी केले. कार्यक्रमात देवस्थानचे अध्यक्ष किरण भिलारे यांनी अहवालातील ठळक बाबी आणि संस्थेच्या आगामी योजनांची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. उपाध्यक्ष गणेश आप्पा ढोरे, विश्वस्त भास्करराव म्हाळसकर, सुखदेव महाराज ठाकर, दत्तात्रय महाराज शिंदे यांनीही आपली मनोगते व्यक्त केली.

       अखिल भारतीय वारकरी मंडळ मावळ तालुकाअध्यक्ष दत्तात्रय लायगुडे, उद्योजक शंकरराव शेळके, मा सभापती गुलाबराव म्हाळसकर, अखिल भारतीय वारकरी मंडळ अध्यक्ष दत्तात्रय लालगुडे, चार्टड अकाउंटंट किसनराव खाणेकर, पंढरीनाथ भिलारे, पंढरीनाथ ढोरे, मा मा. चेअरमन चंद्रकांत ढोरे, गंगाधर ढोरे, भरतशेठ म्हाळसकर, मनोजभाऊ ढोरे, मा नगरसेवक ॲड. विजयराव जाधव, रविंद्र म्हाळसकर आदिसह तालुक्यातील वारकरी मंडळ व ग्रामस्त मोठया संख्येने यावेळी उपस्थित होते.    

        कार्यक्रमाचे आयोजन देवस्थानचे अध्यक्ष किरण भिलारे, उपाध्यक्ष गणेशआप्पा ढोरे, विश्वस्त  अनंता कुडे, चंद्रकांत ढोरे, ॲड. अशोकराव ढमाले, तुकाराम ढोरे, सुनिता कुडे यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक देवस्थान चे विश्वस्त सचिव अनंता कुडे, स्वागत सुभाषराव जाधव, दत्तात्रय महाराज शिंदे तर सूत्रसंचालन हभप गणेश महाराज जांभळे व आभार नारायणराव ढोरे यांनी मानले.


इतर बातम्या