Breaking news

Lonavala News l लोणावळ्यात शाळकरी मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न; आरोपी अटकेत

लोणावळा: शहरातील जयचंद चौक येथे सोमवारी (24 मार्च) सकाळी 11:15 च्या सुमारास एका भामट्याने अल्पवयीन शाळकरी मुलीला चॉकलेट आणि फ्रूटीचे आमिष दाखवून अपहरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दुकानदाराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला.

      सदर आरोपीने मुलीचा हात धरून जबरदस्तीने तिला दुकानात नेले आणि तिला चॉकलेट व फ्रुटी देत आपल्या सोबत येण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न केला. दुकानदार व इतरांनी आरोपीला पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

      या प्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 137(2), 62 आणि पोक्सो कायद्याच्या कलम 12 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचे नाव श्रीपती महादेव गायकवाड (रा. साने चौक, स्वराज्य हौसिंग सोसायटी, चिखली, पुणे) असे आहे. लोणावळा शहर पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रमेश भिसे या घटनेचा पुढील तपास करत आहेत.


इतर बातम्या