प्रसिद्ध अभिनेता अरमान कोहली यांच्या लोणावळ्यातील बंगल्यात चोरी करणारे दोघे गजाआड

लोणावळा : प्रसिद्ध सिनेअभिनेता अरमान कोहली यांच्या गोल्ड व्हॅली, कोहली इस्टेट लोणावळा येथील बंगल्यात 25 मार्च रोजी मोठी चोरी झाली होती. ही चोरी करणारे त्यांचे दोन्ही कामगार यांना वसई येथून ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांनी चोरीची कबुली त्यांनी दिल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली असल्याची माहिती लोणावळा शहर पोलिसांनी दिली.
अभिनेते आरमान कोहली यांनी त्यांच्या बेडरूममधील साइड टेबलच्या लॉकरमधून 12 तोळ्यांची सोन्याची चैन आणि एक लाख रुपये ठेवले होते. 25 मार्च रोजी हा ऐवज लंपास झाला होता. याप्रकरणी त्यांच्या घरी काम करणारे दोन नोकर, आकाश गौड (वय 21, रा. जौनपूर, उत्तर प्रदेश) आणि संदीप गौड (वय 23, रा. खुतान, जौनपूर, उत्तर प्रदेश) यांच्यावर अरमान यांनी संशय व्यक्त केला होता.
या प्रकरणाचा लोणावळा शहर पोलीस व पुणे ग्रामीण च्या स्थानिक गुन्हे शाखेने तांत्रिक तपास करत आरोपी यांचा ठावठिकाणा माहीत करत त्यांना वसई येथून ताब्यात घेतले. दोघा आरोपींनी चोरी केल्याची कबुली दिली असल्याचे पोलीस पथकाने सांगितले.
पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, लोणावळा शहर चे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक अभिजीत सावंत, अनिल केरुरकर, पोलीस हवालदार राहुल पवार, राजू मोमिन, अतुल डेरे, मंगेश थीगळे, सागर नामदास , सुधार भोईटे, तुषार भोसले यांच्या पथकाने सदरची कामगिरी केली आहे.