Breaking news

Accident News l मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर भरधाव ट्रक ची रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पिकअप टेम्पोला धडक; दोन जणांचा जागीच मृत्यू

लोणावळा : मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर ताजे गावाच्या हद्दीमध्ये पहाटे 03.30 वाजण्याच्या सुमारास एका भरधाव ट्रक ने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पिकअप टेम्पोला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. कामशेत पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये हा अपघात घडला आहे. 

   अजय कन्हैयालाल यादव (राहणार मुंबई कुर्ला गार्डन, इंदिरानगर) व अफजल मुर्तुजा खान (राहणार गणेशपुर, उत्तर प्रदेश) या दोघांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. याप्रकरणी टेम्पो चालक राकेश कुमार नेत प्रसाद यादव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मिक्सर ट्रक चालक राजेश यादव (अजमगड उत्तर प्रदेश) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     कामशेत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर ताजे गावाच्या आतमध्ये किलोमीटर क्रमांक 67/700 या ठिकाणी मुंबईच्या दिशेने कोंबड्या घेऊन जाणारा पिकप टेम्पो क्रमांक MH 01 DR 7567 हा टायर पंचर झाल्याने रस्त्याच्या कडेला उभा होता. मयत झालेले अजय व अफजल हे टायर बदलत होते तर फिर्यादी राकेश कुमार मागून येणाऱ्या वाहनांना हात दाखवत होता. त्यावेळी भरधाव वेगात आलेला अशोक लेलँड मिक्सर ट्रक नंबर MH 46 BU 5697 यांनी सदर पिकप टेम्पोला मागून जोरात धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला यामध्ये त्या दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास कामशेत पोलीस करत आहेत.

इतर बातम्या