Breaking news

टायगर पॉईंट आणि लायन पॉईंट परिसरात स्वच्छता व वृक्षारोपण अभियान; शिवसेना वर्धापन दिनानिमित्त उपक्रम

लोणावळा :  शिवसेनेच्या 59 व्या वर्धापन दिनानिमित्त जगप्रसिद्ध टायगर पॉईंट आणि लायन पॉईंट परिसरात स्वच्छता आणि वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला. पुणे जिल्ह्यातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळ्याच्या प्रारंभीच शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी समाजभिमुख उपक्रम राबवून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला.

      ढगाळ वातावरण आणि सतत पडणाऱ्या पावसाचा अडथळा न मानता, मोठ्या संख्येने शिवसैनिक, स्थानिक नागरिक आणि दुकानदारांनी या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. परिसराची स्वच्छता करून विविध प्रकारची झाडे लावण्यात आली. या उपक्रमात शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख मच्छिंद्र खराडे, माजी उपसरपंच श्यामबाबू वाल्मिकी, सदानंद पिलाने, वाहतूक सेनेचे दिनेश वीर, सुनील इंगोळकर, महेश खराडे, भीमा शिंगाडे, योगेश येवले, सुनील कदम, अंकुश खरात, सीमा ताई चौबे, रोहित आखाडे, दत्ता आखाडे, संतोष शेडगे, सनी साळुंखे, संदीप मरगळे, सतीश गोमते, विजय चौरे आदी पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. प्रकृतीच्या रक्षणासाठी आणि पर्यटनस्थळे स्वच्छ ठेवण्याचा निर्धार या उपक्रमातून सर्वांनी व्यक्त केला.

इतर बातम्या