Breaking news

Lonavala l चैतन्य नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्ष पदी जितेंद्र राऊत तर उपाध्यक्षपदी कांताराम दळवी यांची बिनविरोध निवड

लोणावळा : चैतन्य नागरी सहकारी पतसंस्था भांगरवाडी, लोणावळा यांची सन 2025 ते 2030 या कालावधीसाठीची पंचवार्षिक निवडणूक दिनांक 17 जून 2025 रोजी पार पडली. सदर निवडणूक वडगाव मावळ येथील निबंधक कार्यालयात, निवडणूक अधिकारी सौ. मनिषा जरे (सरकारी अधिकारी) यांच्या अध्यक्षतेखाली आणि सहाय्यक श्री. राकेश निखारे यांच्या उपस्थितीत शांततेत पार पडली. व्यवस्थापक सभांजी पडवळ यांनी निवडणूकीचे सहाय्यक म्हणून कामकाज पाहिले.

       अध्यक्ष पदासाठी जितेंद्र बबन राऊत यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे त्यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. तसेच उपाध्यक्ष पदासाठी कांताराम नथु दळवी यांचाही एकमेव अर्ज दाखल झाल्यामुळे त्यांचीही उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली.

     या निवडणुकीवेळी संस्थापक मारुती बाबू साठे, संचालक रमेश विठ्ठल पिसे, एकनाथ सखाराम काळे, दथरथ मुरलीधर गावकर, गोपाळकृष्ण महादेव भवारी, सचिन सखाराम गोसावी, अनिरुद्ध हनुमंत फाटक, संचालिका गौरी अनिल केदारी, मनिषा चंद्रशेखर तिकोणे, तसेच तज्ञ संचालक ॲड. सुनील गेणू गाडे हे उपस्थित होते. तसेच लोणावळा नगरपरिषद सेवक वर्ग सहकारी पतसंस्थेचे माजी अध्यक्ष रमेश विष्णू कुंभार हे देखील उपस्थित होते.


इतर बातम्या