शिवसेने पक्षाचा 59 वा वर्धापनदिन लोणावळ्यात साजरा; विद्यार्थ्यांना वह्या व खाऊ वाटप

लोणावळा : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रेरणेतून स्थापन झालेल्या शिवसेनेचा 59 वा वर्धापनदिन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या लोणावळा शहर शाखेच्या वतीने उत्साहात साजरा करण्यात आला.
या निमित्ताने शिवसेना शहरप्रमुख परेश भाऊ बडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली खंडाळा येथील संत गाडगेबाबा प्राथमिक विद्यालय शाळा क्रमांक 10 मधील विद्यार्थ्यांना वह्यांचे तसेच खाऊचे वाटप करण्यात आले. समाजसेवा आणि सामाजिक बांधिलकीचा वारसा पुढे नेत हा उपक्रम राबविण्यात आला.
कार्यक्रमास पुणे जिल्हा शिवसेना महिला आघाडीच्या सह-संपर्कप्रमुख श्रीमती शादान चौधरी, जिल्हा संघटक बाळासाहेब फाटक, तालुका प्रमुख आशिष ठोंबरे, तालुका सल्लागार मारुती खोले, शहर सल्लागार रामभाऊ थरकुडे, विभाग प्रमुख संजय शिंदे, सुनील जाधव, अशोक गवारणे, महिला आघाडी उपशहर संघटीका सुरेखा देवकर, प्रतीभा कालेकर, उर्मिला शर्मा, युवती सेना शहर अधिकारी सना चौधरी साळुंके, खंडाळा जेष्ठ नागरिक संघाचे गोपीचंद सोनवणे व वसंत कदम, शाखाप्रमुख जीतू ठोंबरे, तसेच धीरज घारे, कुणाल सपकाल, सत्तार शेख, अमित पंचमुख, जयवंत ठाकूर, धोंडीबा मावकर यांसह अनेक शिवसैनिकांनी कार्यक्रमात सहभाग घेतला.
"शिवसेनेच्या विचारांची नाळ समाजाशी घट्ट जोडलेली असून, सामाजिक उपक्रमांद्वारे ही नाळ अधिक बळकट करण्याचे काम सुरु आहे," असे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले.