Breaking news

खंडाळा तलाव परिसरातील वाहतूक कोंडी रोखण्यासाठी बोटिंग क्लबचे स्टॅन्ड भैरवनाथ मंदिराकडे करा – डॉ. किरण गायकवाड

लोणावळा : खंडाळा तलावामध्ये लोणावळा नगर परिषदेच्या वतीने बोटिंग क्लब सुरू केला आहे. पर्यटकांसाठी हे ठिकाण आकर्षणाचे केंद्र बनत असून मोठ्या प्रमाणात पर्यटक खंडाळा तलाव परिसरामध्ये बोटिंग साठी थांबत आहेत. मात्र या भागामध्ये वाहन तळ्याची जागा उपलब्ध नसल्याने रस्त्याच्या कडेला जेथे जागा मिळेल त्या ठिकाणी वाहने उभी केली जात आहेत त्यामुळे खंडाळा तलाव परिसरामध्ये दैनंदिन मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली आहे. 

       याविषयी बोलताना डॉक्टर किरण गायकवाड म्हणाले, सदरचा तलाव हा मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गाच्या लगत आहे. त्यामुळे या मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. ही कोंडी सोडवायची असेल तर तलावाच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या भैरवनाथ मंदिरासमोर दोन मोठी मैदानी मोकळी असल्याने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहने उभी राहू शकतात. लोणावळा नगरपरिषद प्रशासनाने या ठिकाणी होणारी वाहतूक कोंडी व अपघाताची समस्या रोखण्यासाठी वरील पर्यायाचा विचार करत लवकरात लवकर खंडाळा वोटिंग तलावाचे स्टॅन्ड हे भैरवनाथ मंदिराच्या बाजूला करावी अशी मागणी डॉक्टर किरण गायकवाड यांनी केली आहे.

इतर बातम्या