Breaking news

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सामुदायिक विवाह सोहळा समितीच्या वतीने 7 मे रोजी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन

लोणावळा : कार्ला पंचक्रोशीतील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सामुदायिक विवाह सोहळा समितीच्या वतीने 07 मे रोजी सायंकाळी 05 वाजून 10 मिनिटांनी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. वेहेरगाव येथील आई एकवीरा देवीच्या पायथा मंदिरासमोर हा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न होणार आहे. या विवाह सोहळ्याची माहिती देण्यासाठी 03 मे रोजी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

      यावेळी विवाह सोहळा समितीचे संस्थापक अध्यक्ष शरदराव हुलावळे, संतोष केदारी, अध्यक्ष अशोक पडवळ, अमोल भेगडे, नितीन देशमुख, सीमाताई आहेर, भगवान देशमुख, सुनील गरुड, मच्छिंद्र केदारी, विशाल जमदाडे, भाऊ महाराज मापारी, मुरारी लालजी शर्मा, सचिन भानुसघरे, शांताराम महाराज ढाकोळ, सोमनाथ सावंत, मंगेश हुलावळे, संदीप तिकोने, खंडू आहेर, विवाह सोहळा समितीचे सल्लागार भाऊसाहेब हुलावळे आदी मान्यवर उपस्थित होते.

      धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज सामुदायिक विवाह सोहळ्याचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. मागील दोन वर्षांमध्ये 11 जोडप्यांची लग्न झाली असून या वर्षी देखील पाच जोडप्यांची लग्न या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये होणार आहेत.

        विवाह सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या जोडप्यांना विवाह सोहळा समितीच्या वतीने व काही मान्यवरांच्या कडून भेटवस्तू देण्यात येणार आहेत. त्यामध्ये सोहळा समितीकडून जोडप्यांना एक तोळे सोने, मिलिंद बोत्रे यांच्या वतीने पाच भांडी, पैंजण व वर पोशाख, मनीषा आंबेकर यांच्या वतीने वधू साठी मनगटी घड्याळ, मच्छिंद्र केदारी यांच्या वतीने वरासाठी मनगटी घड्याळ, सोळा समितीचे अध्यक्ष अशोक पडवळ व चंद्रकांत शेलार यांच्या वतीने वधू साठी लग्नाचा शालू, संगीता केदारी यांच्या वतीने जोडवी, नितीन वाडेकर यांच्याकडून सुटकेस, सचिन हुलावळे यांच्याकडून टेबल फॅन, नितीन देशमुख यांच्याकडून सर्व वधूंसाठी नथ, संसार उपयोगी वस्तूंमध्ये नितीन वाडेकर यांच्याकडून इस्त्री, बबन इंगवले यांच्याकडून बादल्या, शांताराम ढाकोळ यांच्याकडून टोप्या, सुनील गरुड यांच्याकडून अक्षदा, दिलीप महाराज खेंगरे यांच्याकडून लग्नासाठीचे हार, मंगेश देशमुख यांच्याकडून नारळाचे पोते, संजय सोनवणे यांच्याकडून वधू वरांसाठी बूट चप्पल, सीमाताई आहेर यांच्या वतीने सुरमई मंगलाष्टका बिदागी देण्यात येणार आहेत.

     07 मे रोजी सकाळी दहा वाजता विवाह सोहळ्याच्या ठिकाणी साखरपुडा समारंभ होणार आहे. दुपारी बारा वाजता हळदी समारंभ. तदनंतर तीन वाजेपर्यंत सर्व वऱ्हाडी मंडळींसाठी भोजन. सायंकाळी पाच वाजून दहा मिनिटांनी हा सामुदायिक विवाह सोहळा संपन्न होणार आहे. विवाह सोहळ्यापूर्वी वधू-वरांची वाजत गाजत भव्य अशी मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यासाठी लागणारे ढोल ताशे बँड व रथ हे विवाह सोहळा समितीकडून देण्यात येणार आहे. संस्कार शाळा प्रबलजी महाराज कुटिया आश्रम दहिवली यांच्या वतीने या सोहळ्यासाठीची भोजन व्यवस्था करण्यात आली असल्याचे यावेळी सोहळा समितीच्या वतीने सांगण्यात आले. मावळ पंचक्रोशी मधील हा अतिशय भव्यदिव्य सोहळा असल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी या सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये सहभागी होत नववधूवरांना शुभाशीर्वाद द्यावेत असे आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. कॅबिनेट मंत्री संजय सावकारे, खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनील शेळके यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आजी-माजी आमदार या विवाह सोहळ्यात सहभागी होणार आहे अशी माहिती समितीच्या वतीने देण्यात आली.

  

इतर बातम्या