Breaking news

गुरुपौर्णिमा विशेष : माजी सरपंच सोनाली मनोज जगताप यांच्याकडून व्हिपीएस इंग्लिश मिडियम स्कूलला वाॅटर प्युरिफायर भेट

लोणावळा : गुरु पौर्णिमेच्या निमित्त वाकसई गावच्या माजी सरपंच सोनाली मनोज जगताप यांच्या वतीने वाकसई चाळ येथील व्हिपीएस इंग्लिश मिडियम स्कूल या शाळेला वाॅटर प्युरिफायर (वाॅटर फिल्टर) भेट देण्यात आला.

     वाकसई येथील व्हिपीएस इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये वाकसई चाळ, वाकसई, देवघर, वरसोली भागातील लहान मुले शिक्षण घेत आहेत. या मुलांना व शाळेतील शिक्षकांना फिल्टर पाणी मिळावे याकरिता गुरुपौर्णिमेचे औचित्य साधत ही भेट देण्यात आली असल्याचे सोनाली जगताप यांनी सांगितले.

    या कार्यक्रमासाठी विद्या प्रसारणी सभा नियामक मंडळाचे सदस्य भगवान आंबेकर, माजी उपसरपंच मनोज जगताप, माजी उपसरपंच बाळासाहेब भरत येवले, व्हिपीएस इंजिनिअरिंग काॅलेजचे प्राचार्य मानव ठाकूर, मुख्याध्यापिका निशा नाईक, सामाजिक कार्यकर्ते किशोर जगताप, गणपत विकारी, अशोक ढाकोळ, हुसेन शेख, रोहित जगताप, योगेश येवले, किशोर देशमुख, मुकुंद जगताप, कैलास जगताप, उमेश जगताप यांच्यासह शाळेच्या सहशिक्षिका लक्ष्मी अंधेली, कविता कुमठेकर, सरिता येवले, स्वाती मोहिते, रुपाली तिकोणे, वर्षा जगताप, हर्षदा थत्ते आदी उपस्थित होते.

इतर बातम्या