KaivalyDham Yog Sansthan l कैवल्यधाम योग संस्थेमध्ये शताब्दी वर्षानिमित्त 16 व 17 मे रोजी शास्त्रीय गायन, योग महोत्सव व योग व्याख्यानमालेचे आयोजन

लोणावळा : आंतरराष्ट्रीय कीर्तीचे योग केंद्र अशी ओळख असलेल्या लोणावळा शहरातील कैवल्यधाम योग संस्थेमध्ये शताब्दी वर्षानिमित्त 16 व 17 मे रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 16 मे रोजी सायंकाळी 6.30 वाजता हनुमान मंदिरासमोर आंतरराष्ट्रीय कीर्तीचे प्रसिद्ध कलाकार डॉक्टर पंडित अजय पोहनकर, प्रख्यात शास्त्रीय गायिका अंजली पोहनकर यांच्या शास्त्रीय गायनाचे आयोजन करण्यात आले आहे.
17 मे रोजी सकाळी 07 ते 08 या वेळेमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या 35 दिवशीय कार्यक्रम सोहळ्याचे उद्घाटन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी मावळ लोकसभेचे संसद रत्न खासदार श्रीरंग आप्पा बारणे, सांदिपनी विद्या निकेतन अध्यात्मिक गुरु रमेश भाई ओझा, विदुत जामवाल हे मान्यवर उपस्थित राहणार आहे. या योग महोत्सवामध्ये लोणावळा शहर व परिसरातील नागरिक तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी असे शेकडो नागरिक उपस्थित राहणार आहेत अशी माहिती कैवल्यधाम योग संस्थेच्या वतीने देण्यात आली आहे.
योग महोत्सव साजरा झाल्यानंतर सकाळी 11 वाजता कुडीलाल सभागृह या ठिकाणी सांदिपनी विद्या निकेतन अध्यात्मिक गुरु रमेश भाई ओझा यांच्या शुभहस्ते स्वामी कुवलयानंद व्याख्यानमालेचे उद्घाटन करण्यात येणार आहे. आधुनिक जीवन व अध्यात्मिकता हा या व्याख्यानमालेचा विषय असणार आहे.
या तीनही कार्यक्रमांमध्ये लोणावळा शहर व परिसरातील नागरिकांनी सहभागी होत, कार्यक्रमाचा भाग व्हावे असे आवाहन कैवलधाम योग संस्थेचे सचिव व मुख्य कार्यकारी अधिकारी सुबोध तिवारी यांनी केले आहे.