Breaking news

आईची फसवणूक करून जागा विकल्याप्रकरणी न्याय न मिळाल्यास उपोषण करण्याचा इशारा

लोणावळा : आईची फसवणूक करत जागा विकल्याप्रकरणी न्याय न मिळाल्यास उपोषण करण्याचा इशारा संतोष उर्फ राजू परदेशी यांनी दिला आहे. याप्रकरणी संतोष उर्फ राजू परदेशी व त्यांचे आई श्रीमती पद्मा छोटेलाल परदेशी यांनी पत्रकार परिषद घेत उपोषणाचा इशारा दिला आहे. 

    पत्रकार परिषदेत संतोष उर्फ राजू परदेशी म्हणाले, श्रीमती पद्म छोटेलाल परदेशी व त्यांची चार मुले यांची लोणावळ्यामध्ये काही सामायिक जागा (सिटी सर्व्हे नंबर 39 मध्ये 1 / 2आहे. श्रीमती पद्मा परदेशी यांनी आपल्या हिश्श्याच्या जागेचे मृत्युपत्र तयार करत त्याची चार मुलांमध्ये विभागणी केली होती. माझ्या मृत्यू पश्चात त्या जागा त्या त्या मुलांना देण्यात याव्यात असे मृत्युपत्रात नमूद करण्यात आले होते. असे असताना श्रीमती पद्मा परदेशी ह्या जिवंत असताना त्यांच्या एका मुलाने त्यांच्या हिश्श्याची जागा त्यांनी आईला कोणती पूर्वकल्पना न देता परस्पर विक्री केली आहे. सदर जागेचे हक्कसोड पत्र करताना संबंधित मुलाने आपल्या इतर दोन भाऊ व एक बहीण यांचे हक्कसोड पत्र घेतले व सिटी सर्व्हे च्या उताऱ्यावर नोंदणी करताना आईचे नाव देखील परस्पर त्या उताऱ्यावरून वगळले. त्या दस्तऐवजाच्या आधारे त्यांनी सदर जागेची विक्री केली आहे. सदर विक्री करण्यात आलेली जागा ही लोणावळा नगर परिषदेची भाडेतत्त्वाची (लिज) जागा आहे. लोणावळा नगर परिषदेच्या कोणत्याही लीजच्या जागेची परस्पर नोंद अथवा हस्तांतरण करू नये असे लोणावळा नगर परिषदेने दुय्यम निबंधक कार्यालयाला यापूर्वीच लेखी कळवले असून देखील सदर जागेच्या हस्तांतरण व खरेदी करण्यात आली आहे.

      आईने कोणतीही हक्क सोड पत्र दिलेले नसताना तिचे नाव फेरफार नोंद करताना परस्पर उताऱ्यावरून वगळण्यात आले आहे तसेच आई जिवंत असताना मृत्युपत्राचा आधार घेत जागेची विक्री करण्यात आली आहे असा फसवणुकीचा प्रकार झाला असल्याने सदर जागेचे झालेले दस्त हे तात्काळ रद्द करण्यात यावे व खोटे दस्तऐवज बनवणाऱ्यांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी श्रीमती पद्मा परदेशी व संतोष उर्फ राजू परदेशी यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. मागील काही दिवसांपासून लोणावळ्यातील काही मंडळी माजी व माझ्या आईची बदनामी करत असल्यामुळे मला पत्रकार परिषद घेत या बाबतचा थोडासा करावा लागला आहे. लोणावळा शहर पोलिसांकडे अनेक वेळा जाऊन देखील ते गुन्हा दाखल करायला तयार नसल्याने अखेर याप्रकरणी वडगाव मावळ न्यायालय मध्ये केस दाखल करण्यात आली असल्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले.

इतर बातम्या