VPS School l लोणावळा शहरातील व्हि.पी.एस शाळेचा दहावीचा निकाल 99.04 % तर बारावीचा निकाल 97.45 %

लोणावळा : लोणावळा शहरातील सर्वात मोठी शाळा अशी ओळख असलेल्या विद्या प्रसारणी सभेच्या व्हि.पी.एस या शाळेचा दहावीचा निकाल यावर्षी 99.04 % लागला असून बारावीचा निकाल 97.45 % लागला आहे.
व्हि.पी.एस शाळेतून 314 विद्यार्थ्यांनी दहावीची बोर्ड परीक्षा दिली होती त्यापैकी 311 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. राज संतोष साठे हा विद्यार्थी 96.40 % गुण मिळवत शाळेत प्रथम आला आहे. वेदिका कुंडलिक राठोड व तनिष्का दगडु गायकवाड यांनी 95.40 % गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळवला आहे. रेवती संदीप परदेशी हिने 90.80 टक्के गुण मिळवून तिसरा क्रमांक मिळवला आहे. काव्यांजली चंद्रकांत पांडव व कौस्तुभ नारायण पवार यांनी 90.40 % गुण मिळवत चवथा क्रमांक मिळविला आहे. तर कुश अशोक राऊळ ने 90.20 % गुण मिळवत शाळेत पाचवा क्रमांक प्राप्त केला आहे.
या व्यतिरिक्त प्रेरणा नवनाथ कांबळे (89.60%), आदिती अनिल कदम (89.20%), निशा बाबुलाल वर्मा (87.20%), श्रद्धा लक्ष्मण महाडिक (87%), कृष्णा बाबासाहेब तांगडे (87%), मनस्वी प्रशांत गादी (86.60%), हर्षवर्धन विठ्ठल कुंभार (85.20%) गुण मिळवत गुणवत्ता यादीत आले आहेत.
बारावी मध्ये अबोली बोडके व मेहवश शेख प्रथम
बारावी बोर्ड परीक्षेसाठी विद्या प्रसारणी सभेच्या द.पु. मेहता कॉलेज मधून सायन्स विभागातील 314 व वाणिज्य विभागातील 587 विद्यार्थ्यांनी बोर्ड परीक्षा दिली होती.
वाणिज्य विभाग : एकूण परीक्षेला बसलेले विद्यार्थी 587 यापैकी उत्तीर्ण विद्यार्थी 569, वाणिज्य निकाल 96.93 %. (प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थी) 1} मेहवेश आयुब शेख (93.62%), 2 } पूजा रामकृष्ण पांडे (92.50%), 3} ओम जितेंद्र कदम (90.83%) मेहवश शेख व पूजा पांडे यांना बुक कीपिंग व अकाउंटिंग या विषयांमध्ये शंभर पैकी शंभर मार्क मिळाले आहेत.
सायन्स विभाग : एकूण परीक्षेला बसलेले विद्यार्थी 314 यापैकी उत्तीर्ण झालेले विद्यार्थी 309, सायन्स विभागाचा निकाल 98.41%
प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थी - 1} अबोली दत्तात्रय बोडके (93.83%), 2} समृद्धी उल्हास पाळेकर (89.67%), 3} पुर्वा दिलीप धामणस्कर (84.33%)