Breaking news

11th Online Admission l व्हीपीएस हायस्कूल मध्ये 19 मे पासून अकरावी ऑनलाइन प्रवेशाची प्रक्रिया सुरू होणार

लोणावळा : विद्याप्रसारणी सभेचे व्हीपीएस हायस्कूल व द.पु. मेहता कनिष्ठ महाविद्यालय लोणावळा या ठिकाणी इयत्ता अकरावी ऑनलाइन प्रवेशाची प्रक्रिया 19 मे पासून सुरू होणार आहे. यावर्षी प्रथमच अकरावीचे प्रवेश हे ऑनलाइन पद्धतीने होणार आहेत. याकरिता व्हीपीएस हायस्कूलमध्ये ऑनलाइन अर्ज भरण्याची सुविधा विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. 19 मे ते 28 मे दरम्यान सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेमध्ये सदरचे ऑनलाईन अर्ज भरता येणार आहेत. विद्यार्थ्यांनी गैरसोय टाळण्यासाठी सुरुवातीच्या दिवसांमध्येच आपले प्रवेश अर्ज भरून घ्यावेत असे आवाहन व्ही पी एस हायस्कूलचे प्राचार्य सुहास विसाळ व शाळा समितीचे अध्यक्ष भगवान आंबेकर यांनी केले आहे. 

     यावर्षी दहावीचा निकाल हा सर्वत्र चांगला लागला असल्यामुळे व विद्यार्थी मोठ्या संख्येने गुणवत्ता यादीमध्ये असल्याने निश्चितच अकरावी प्रवेशाला देखील मोठी चढाओढ राहणार आहे. व्ही पी एस हायस्कूल मध्ये कॉमर्स व सायन्स हे दोन विभाग आहेत.

अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे 

1} इयत्ता दहावी ऑनलाईन निकालाची प्रत 

2} आधार कार्ड झेरॉक्स (विद्यार्थी)

3} जात प्रमाणपत्र (उपलब्ध असल्यास) 

4} पासपोर्ट साईज दोन फोटो.

इतर बातम्या