Breaking news

लोणावळा ग्रामीण पोलिसांची अवैध दारूविरोधात धडक कारवाई; 43,960 रुपयांचा मुद्देमाल जप्त

लोणावळा : लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध दारू विक्रीविरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत 43 हजार 960 रुपये किमतीचा प्रोव्हिजनचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई 21 सप्टेंबर 2026 रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास वाकसाई (ता. मावळ) येथील हॉटेल दौलत येथे करण्यात आली.

       लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेल दौलत येथे शुभम जगनाथ शिंदे (वय 25, रा. ब्राह्मणवाडी, वडगाव, ता. मावळ, जि. पुणे) हा बेकायदा विना परवाना देशी-विदेशी कंपनीच्या बिअरच्या बाटल्या स्वतःच्या ताब्यात बाळगून त्या ओळखीच्या व्यक्तींना विक्री करताना आढळून आला. त्याच्याकडून एकूण 43,960 रुपये किमतीचा प्रोव्हिबिशनचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

       या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात संबंधित कायदेशीर तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार नवनाथ चपटे करीत आहेत.

ही कारवाई परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक तथा प्रभारी अधिकारी भुषण माने आणि महिला सहायक पोलीस निरीक्षक विजया म्हेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नाथा केकाण, ग्रेड पोलीस उपनिरीक्षक प्रकाश वाघमारे, तसेच पोलीस हवालदार नितीन कदम, जय पवार, विनोद गवळी, पोलीस कॉन्स्टेबल सतीश कुदळे, गोकुळ खेडकर, यश देसाई, देवकाते व चालक-महिला पोलीस कॉन्स्टेबल अवंती मोहिते यांच्या पथकाने केली.

       सदर कारवाई पोलीस अधीक्षक संदिप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक शुभम कुमार आणि लोणावळा विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोम्पे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

इतर बातम्या