Breaking news

नगरपालिका बिल देत नसल्याचा निव्वळ कांगावा ! ठेकेदारांने छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या कामासाठी वापरला निकृष्ट दर्जा दगड; तंबी देताच - कामगार लग्न सोहळ्याला गेले असल्याचे कारण देत थांबवले काम

लोणावळा : लोणावळा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे काम मागील एक वर्षापासून सुरू आहे. हे काम मे. ग्रीनलँड ही कंपनी करत आहे. सुरुवातीला योग्य प्रकारे सुरू असलेल्या या कामासाठी मागील महिन्यात ठेकेदाराकडून निकृष्ट दर्जाचा दगड (भुंगीर दगड) व भुंगीर जाळ्या वापरल्या याबाबत लोणावळा नगर परिषद अभियंता यांनी ठेकेदाराला निकृष्ट दर्जाचा दगड बदलण्याचे 1 एप्रिल रोजी लेखी कळविले होते. त्यापूर्वी मेसेज द्वारे देखील सांगितले. तसेच या निकृष्ट कामाचे बिल देण्यात येणार नाही अशी तंबी दिली होती. त्यानंतर ठेकेदाराने सदरचा दगड व जाळ्या बदलण्याबाबत कबुली दिली व पूर्वी सारखा दगड वापरण्याचे कबूल केले होते. त्याप्रमाणे कामाला सुरुवात करत लावलेले दगड काढण्यास सुरुवात केली. तदनंतर कामगार गावाला लग्नाला जाणार असल्याने आठ दिवस काम बंद ठेवत असल्याचे लोणावळा नगर परिषदेला कळविले. असे असताना त्यांनी काही राजकीय नेते मंडळी याच्याशी संपर्क साधत नगर परिषद कामाचे बिल देत नसल्याचे काम बंद करत असल्याचा कांगावा केला आहे. वास्तविक पाहता याची वस्तुस्थिती जाणून घेतली असता सदर ठेकेदाराला 68 लाख रुपये बिल फाउंडेशन कामाचे देण्यात आले आहे. ठेकेदाराने सादर केलेले दुसरे बिल हे पहिल्या बिलात देखील समाविष्ट असल्याने पुन्हा त्या बीलाचे पैसे कसे द्यायचे असे नगर परिषदेकडून सांगण्यात आले आहे. केलेल्या कामाचे प्रत्यक्ष मोजमाप करण्यासाठी उपस्थित राहण्याबाबत ठेकेदाराला 9 एप्रिल रोजी कळविले होते.

        22 एप्रिल रोजी ठेकेदाराने सादर केलेले बिल लेखा परीक्षण विभागाकडे देण्यात आले आहे. ती प्रक्रिया सुरू असताना नगर परिषदत बिल देत नाही हा ठेकेदाराकडून करण्यात येत असलेला कांगावा चुकीचा व अफवा पसरविणारा असल्याचे नगरपरिषदेने ठेकेदाराला लेखी कळविले आहे. तसेच आपण सादर केलेली बिले व तयार केलेली बिले याची नगर परिषद कार्यालयात येऊन प्रत्यक्ष खात्री करा व चुकीच्या अफवा पसरविण्यापेक्षा प्रत्यक्ष कामाला सुरुवात करा असे ठेकेदाराला कळविले आहे. सदरच्या कामासाठी आमदार सुनील शेळके यांची 3 कोटी 14 लाखांचा निधी मंजूर केला असून त्यापैकी पहिल्या टप्प्यातील 95 लाख रुपये जमा देखील झाले आहे. स्मारक सुशोभीकरण कामाव्यतिरिक्त करण्यात येणार असलेल्या फाउंडेशन कामाचा अंदाजे खर्च 94 लाख 31 हजार धरण्यात आला होता. या कामाचे बिल ठेकेदाराला देण्यात आले असल्याचे नगर परिषद प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

      छत्रपती शिवाजी महाराज स्मारक सुशोभीकरण काम हे प्रत्येकाच्या अस्मितेचा विषय आहे. लोणावळा नगर परिषद देखील हे काम दर्जेदार करण्यासाठी प्रयत्नशिल आहे. मात्र ठेकदाराने निकृष्ट दर्जाचा दगड वापरल्याबाबत त्याला सूचित करून काम थांबवत दगड बदलायला लावला म्हणून ठेकेदार नगर परिषदेच्या बाबत कामाचे आजपर्यत पैसे दिले नाही असे पसरवत नगर परिषदेची बदनामी करत आहे. ठेकेदाराने काम बंद करत असल्याबाबत कोणतेही पत्र नगर परिषदेला दिलेले नाही. 1 एप्रिल रोजी ठेकेदाराने आम्ही दिलेली बिले लवकरात लवकर मंजूर करून जारी केली नाही तर प्रकल्पावर त्याचा विपरीत परिणाम होईल असे म्हंटले आहे. वास्तविक बिले सादर झाल्यानंतर ती अभियांत्याकडून लेखा परीक्षण विभागाकडे पाठवली जातात. त्यांनतर त्रयस्त लेखापरीक्षण अहवाल आल्यानंतर बिल अदा केले जाते. ही प्रक्रिया आहे असे लोणावळा नगर परिषद अभियंता पंढरीनाथ साठे यांनी सांगितले. ठेकेदार बिल सादर करताच बिलाचे पैसे देत नसल्याचा कांगावा करत व नगर परिषदेत कामगार लग्नासाठी जाणार असल्याने काम आठ दिवस बंद ठेवतो असे सांगत बाहेर चुकीची माहिती पसरवणे हे ठेकेदाराचे वर्तन योग्य नसल्याचे लोणावळा नगर परिषदेने म्हंटले आहे.


एकाच कामाची दोन बिले; बिल देणे म्हणजे पैशाचा अपव्यय - निखिल कवीश्वर 


छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामाबाबत वेगवेगळी मते पुढे येत आहेत. अधिकृत रीत्या माहिती घेतली असता ठेकेदाराचे एकाच कामाची दोन बिले सादर केली आहेत. त्यापैकी मुख्य बिल मंजूर केले असून पैसे देखील ठेकेदाराला दिले आहेत. पुन्हा त्याच कामाचे बिल देणे म्हणजे पैशाचा अपव्यय होणार आहे. उर्वरित दोन बिले लेखा परीक्षण विभागाकडे आहेत, नियमाप्रमाणे झालेले काम व बिले याची पडताळणी करत बिले दिली जातात. असे असताना महाराजाच्या पुतळ्याचे काम ठेकेदार थांबवत असेल तर ते योग्य नाही. ठेकेदाराने कामासाठी योग्य दर्जाचे दगड व मटेरियल वापरावे तसेच नगर परिषद प्रशासनाने देखील कामावर सतत लक्ष ठेवत दर्जेदार काम करून घ्यावे असे मत या कामासाठी अनेक वेळा उपोषण व आंदोलन केलेले निखिल कवीश्वर यांची व्यक्त केले आहे. तसेच आम्ही सर्व शिवप्रेमी या कामाच्या ठिकाणी दररोज लक्ष ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.

इतर बातम्या