श्री एकविरा देवी, जोगेश्वरी, दुर्गा परमेश्वरी सामुदायिक विवाह सोहळा समिती अध्यक्ष पदी रोहिदास हुलावळे; नूतन कार्यकारिणी जाहीर
सामुदायिक विवाह सोहळा २४ एप्रिलला; २१ जोडपी विवाहबंधनात अडकणार
कार्ला (प्रतिनिधी) : सर्वसामान्य कुटुंबांचा विवाह सोहळ्यासाठी होणारा आर्थिक बोजा हलका करण्याच्या उदात्त हेतूने कार्यरत असलेल्या श्री एकविरा देवी, जोगेश्वरी, दुर्गा परमेश्वरी सामुदायिक विवाह सोहळा समिती तर्फे यंदा शुक्रवार, दि. २४ एप्रिल रोजी सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी एकूण २१ जोडपी या सोहळ्यात विवाहबंधनात अडकणार आहेत.
मागील १३ वर्षांपासून सातत्याने सामाजिक बांधिलकी जपत या समितीने आतापर्यंत तब्बल १६८ जोडप्यांचे विवाह संपन्न केले आहेत. सर्वसामान्य आणि गरजू कुटुंबांना विवाहाचा अनाठायी खर्च टाळता यावा, तसेच सामाजिक एकात्मता वृद्धिंगत व्हावी या उद्देशाने हा सोहळा दरवर्षी उत्साहात पार पडतो. यंदाच्या २०२६ सालच्या सोहळ्यासाठी समितीची कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. संस्थापक भरत भाई मोरे, दीपक हुलावळे, मिलिंद बोत्रे व अजय शिराली यांच्या उपस्थितीत ही निवड प्रक्रिया पार पडली.
समितीच्या अध्यक्षपदी रोहिदास हुलावळे, तर कार्याध्यक्षपदी शामराव गायकवाड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच
कार्यक्रम प्रमुख – बाळासाहेब येवले
उपाध्यक्ष – भरत मानकर, किसन राणे
सचिव – जयराम आंबेकर
सहसचिव – हनुमंत आहेर
खजिनदार – विश्वेश औटी
सहखजिनदार – बाळासाहेब डुबे
यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
या प्रसंगी समितीचे सर्व सदस्य उपस्थित होते. येत्या २४ एप्रिल रोजी होणाऱ्या या सामुदायिक विवाह सोहळ्याकडे कार्ला परिसरासह संपूर्ण मावळ तालुक्याचे लक्ष लागले आहे. सामाजिक समता, परंपरा आणि सेवाभाव यांचा सुंदर संगम असलेला हा सोहळा पुन्हा एकदा आदर्श निर्माण करेल, असा विश्वास समितीच्या वतीने व्यक्त करण्यात आला आहे. परिसरातील ज्या मुला मुलींची लग्न होणार आहे त्यांनी लवकरात लवकर या सोहळ्यामध्ये आपली नाव नोंदणी करावी असे देखील आवाहन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. सोहळ्यामध्ये विवाह नोंदणीसाठी मुलगा अथवा मुलगी दोघांपैकी एक जण हे मावळ तालुक्यातील असणे गरजेचे आहे.





















