Maval Dam Update l मावळातील पवना धरणामध्ये 36 टक्के तर वडिवळे धरणामध्ये 65 टक्के पाणीसाठा

लोणावळा : मावळ तालुक्यामध्ये मागील चार दिवसापासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे धरणांच्या पाणी साठ्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होऊ लागली आहे. मावळ तालुक्यातील मोठे धरण असलेल्या पवना धरणामध्ये आज मितीला 36% पाणीसाठा झाला असून वडिवळे धरणामध्ये 65 टक्के पाणीसाठा झाला आहे. यासह कासारसाई या धरणामध्ये 55.85 टक्के, आंद्रा धरणात 44.85 टक्के पाणीसाठा झाला आहे. जोरदार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहू लागले आहे.