Heavy Rain Fall l मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग व पोटोबा महाराज मंदिराचा परिसर झालाय जलमय… सर्वत्र पाणीच पाणी

लोणावळा : मावळ तालुक्यामध्ये सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. मुसळधार कोसळणाऱ्या या पावसामुळे वडगाव मावळ येथे मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्ग पूर्णतः पाण्याखाली गेला आहे तर मावळ तालुक्याचे आराध्य दैवत असलेले पोटोबा महाराज मंदिर व समोरील रस्ता पूर्णपणे जलमय झाला आहे. या परिसरातून तेजा करताना नागरिकांना व वाहन चालकांना मोठ्या प्रमाणात कसरत करावी लागत आहे. नायगाव व कामशेत परिसरात देखील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.
लोणावळा शहरासह मावळ तालुक्यात सर्वत्र मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. मुसळधार कोसळणाऱ्या या पावसामुळे सर्व परिसर जलमय झाला असून अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. सकल भागात तर मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून नागरिकांनी काळजी घ्यावी असे आव्हान करण्यात आले आहे. लोणावळा शहरातील भुशी धरणाच्या पायऱ्यांवरून अतिशय वेगाने पाणी वाहत असल्याने त्या भागात सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांनी जाऊ नये अशा स्वरूपाच्या सूचना देण्यात आले आहे. पुढील 48 तास पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.