Lonavala News l डोंगरगावात जनावरांना भूल देऊन पळवून नेण्याचा प्रयत्न

लोणावळा : लोणावळा शहराच्या लगत असलेल्या डोंगरगाव येथे रविवारी रात्री ते सोमवारी पहाटे दरम्यान तीन जनावरांना भूल देऊन पळवून नेण्याचा प्रयत्न कसाय्यांनी केला होता. मात्र स्थानिक नागरिकांच्या जागरूकतेमुळे सदरचा प्रयत्न फसला आहे. एक गाय व दोन बैल यांना भूल देण्यात आली होती. मागील काही दिवसात गो रक्षक संघटनेकडून कत्तलखान्यात घेऊन जाणाऱ्या अनेक जनावरांना जीवदान देण्यात आले आहे. तसेच मोठ्या प्रमाणात गो मांस देखील पकडले होते. स्थानिक नागरिकांनी जागरूक राहून आपल्या आजूबाजूला असे काही प्रकार घडत असतील तर गो रक्षक संघटनेला तत्काळ कळवावे असे आवाहन करण्यात आले आहे. स्थानिक नागरिक संजय तिखे, शिवदुर्ग रेस्क्यू पथक व गो रक्षक संघटना यांच्या सतर्कतेमुळे डोंगरगाव येथील घटना टळली आहे.