Breaking news

Lonavala News l लोणावळा बाजार भागामध्ये वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने व्यापारी व नागरिक त्रस्त; वीज वितरण कार्यालयावर काढला मोर्चा

लोणावळा : लोणावळा बाजार भाग, रायवुड परिसर, भांगरवाडी या परिसरामध्ये मागील काही दिवसापासून वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने व्यापारी व नागरिक त्रस्त झाली आहेत. मागील दोन महिन्यांपासून विजेचा हा लपंडाव सुरू आहे. दिवसभरामध्ये किमान चार ते पाच वेळा लाईट जात असल्याने व्यवसायिक नुकसान होत आहे. सध्या उन्हाळा देखील तीव्र स्वरूपाचा असल्याने व त्यात दिवसात अनेक वेळा लाईट जात असल्याने नागरिकांना देखील मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या भांगरवाडी येथील कार्यालयामध्ये वारंवार तक्रार करून देखील या समस्येमध्ये सुधारणा होत नसल्याने लोणावळा बाजारभागातील व्यापारी वर्गाने आज महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या नांगरगाव येथील कार्यालयावर मोर्चा काढला होता. लोणावळा अभियंता श्री चव्हाण यांची भेट घेत व्यापारी वर्गाने आपली समस्या त्यांच्यासमोर मांडली तसेच वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्यामुळे होणारा त्रास हा देखील त्यांना विशद करण्यात आला. येथे आठवडाभरामध्ये लोणावळा बाजार भागातील वीज खंडित होण्याची समस्या सोडवत सर्व कामे पूर्ण करण्याचे आश्वासन वीज वितरण अधिकाऱ्यांकडून देण्यात आले असल्याचे व्यापारी वर्गाकडून सांगण्यात आले.

इतर बातम्या

नगरपालिका बिल देत नसल्याचा निव्वळ कांगावा ! ठेकेदारांने छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या कामासाठी वापरला निकृष्ट दर्जा दगड; तंबी देताच - कामगार लग्न सोहळ्याला गेले असल्याचे कारण देत थांबवले काम