Breaking news

लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक पदी दिनेश तायडे तर लोणावळा शहरच्या पोलीस निरीक्षक पदी राजेश रामाघरे

लोणावळा : पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालय अंतर्गत विविध पोलीस निरीक्षक बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांची पुणे ग्रामीण नियंत्रण कक्ष या ठिकाणी बदली झाली असून त्यांच्या जागी आळेफाटा येथील पोलीस निरीक्षक दिनेश सखाराम तायडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोणावळा शहर चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांची देखील पुणे ग्रामीण पोलीस नियंत्रण कक्ष या ठिकाणी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेश रामाघरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

       लोणावळा शहर चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुहास जगताप व लोणावळा ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ या दोघांनाही लवकरच पोलीस उप अधीक्षक पदाची पदोन्नती मिळणार आहे. दोन्ही अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यकालामध्ये लोणावळा शहर व लोणावळा ग्रामीण भागामध्ये उत्तम असा कार्यभाग साधला आहे. 

इतर बातम्या