Breaking news

Lonavala Rain Information l लोणावळा शहरात रविवारी रात्री ते सोमवारी पहाटेपर्यंत 143 मिमी पावसाची नोंद

लोणावळा : पावसाचे माहेरघर असलेल्या लोणावळा शहरांमध्ये मान्सून सक्रिय झाला असून रविवारी रात्री ते सोमवारी पहाटे दरम्यान 143 मिलिमीटर (5.63 इंच) पावसाची नोंद लोणावळ्यात झाली आहे. लोणावळा शहरात यावर्षी आजपर्यंत 791 मिमी (31.14 इंच) पाऊस झाला आहे. 

   मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी पावसाने लवकर हजेरी लावत पुन्हा विश्रांती घेतली होती. मागील दोन तीन दिवस रात्री हजेरी लावलेल्या पावसाने रविवारी देखील रात्री उशीर हजेरी लावली व सोमवारी सकाळपर्यंत पाऊस सुरू राहिल्याने लोणावळ्यातील प्रसिद्ध असे भुशी धरण देखील ओव्हर फुल झाले असून पायऱ्यांवरून पाणी वाहण्यास सुरवात झाली आहे.

इतर बातम्या