पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी स्वीकारला लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचा कार्यभार

लोणावळा : लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांची बदली झाल्यानंतर लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनच्या पोलीस निरीक्षक पदी पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांची नियुक्ती झाली असून त्यांनी नुकताच लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारला आहे.
पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी यापूर्वी बारामती शहर पोलीस स्टेशन तसेच आळेफाटा पोलीस स्टेशन प्रभारी पोलीस निरीक्षक म्हणून काम केले आहे. लोणावळा ग्रामीण व पवनानगर परिसरामध्ये वाढत असलेले जमीन फसवणुकीचे प्रकार व गैरव्यवहार रोखणे तसेच ग्रामीण भागातील कायदा व सुव्यवस्था राखण्याचे महत्त्वाचे काम त्यांना करावे लागणार आहे. तसेच पवनानगर व ग्रामीण परिसरातील पर्यटन स्थळांवर योग्य ती खबरदारी तसेच आई एकविरा देवीच्या यात्रा काळातील नियोजन याकडे लक्ष द्यावे लागणार आहे.
पुणे ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल यांनी पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांची खास नियुक्ती केली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्राकडून मिळाली.