Breaking news

Lonavala Crime News l बापानेच केला पोटच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधमाला पोलिसांनी केली अटक, सर्व स्तरातून घटनेचा तीव्र संताप

लोणावळा : स्वतःच्या पोटच्या अल्पवयीन मुलीवर बापानेच बलात्कार केल्याची घटना लोणावळा शहराच्या लगत असलेल्या भैरवनाथ नगर, कुसगाव येथे घडली आहे. या घटनेच्या सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जात असून नराधमाला कठोरात कठोर शिक्षा करा अशी संतप्त मागणी सर्व स्तरातून होत आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून आरोपीवर लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. 172/2025 भा.न्या.सं. क. 64 (2) (एफ), 65(1), सह बालकाचे लैंगिक आपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4, 8, 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     20 जून रोजी सायंकाळी 5.30 वाजता कॉक्रीट इंडीया कंपनी जवळ भैरवनाथनगर, कुसगांव बु येथे फिर्यादी व आरोपी यांच्या राहत्या घरात हा किळसवाणा प्रकार घडला आहे. घरात मुलगी एकटीच आहे याचा फायदा घेत नराधाम बापामधील राक्षस जागा झाला व त्याने आपल्या पोटच्या मुलीचा घास घेतला. बाप लेकीच्या नात्याला काळिमा फासला आहे. स्वतःच्या घरातच मुली सुरक्षित नसतील तर त्यांनी ज्याचे कोठे. ज्या बापावर मुलीची सर्व जबाबदारी असते तोच बाप मुलीवर अशा प्रकारे अत्याचार करत असेल तर तीने सुरक्षेची अपेक्षा करायची कोणाकडे असा प्रश्न या घटनेमुळे उभा राहिला आहे. अत्याचार केल्यानंतर त्या नराधमाने मुलीला या घटनेची वाच्यता केली तर जीवे मारण्याची सुद्धा धमकी दिली. आई घरी आल्यावर सदर मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितला. ते ऐकून तिच्या पायाखालची जमीनच सरकली मात्र त्या निर्भयाच्या आईने हिंमत करत आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात जाऊन या घटनेची फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यावरून तिचा नवरा (आडनाव पठाण) आहे. त्याला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया म्हेत्रे ह्या करत आहेत.

इतर बातम्या