Breaking news

धक्कादायक l अल्पवयीन मुलीवर बलात्कार; लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लोणावळा : मावळ तालुक्यातील तिकोनापेठ येथे एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात रमेश रामदास वाघमारे (राहणार तिकोनापेठ, पवनानगर, मावळ) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

      अल्पवयीन मुलीच्या आईने याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अल्पवयीन मुलीचे आईने दिलेल्या फिर्यादीनुसार 5 मे ते 10 मे च्या दरम्यान (नेमकी तारीख माहीत नाही) रात्री 9 वाजण्याच्या सुमारास आरोपीच्या राहत्या घरात ही घटना घडली आहे. पीडित मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असताना देखील आरोपी वाघमारे याने सदर मुलीला घरात बोलावून तिच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर लैंगिक अत्याचार केला असल्याचे नमूद केले आहे. फिर्यादीवरून लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता कलम 65 (1), आणि बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम 2012 (पोक्सो कायदा) च्या कलम 4, 8, 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     या प्रकरणाचा पुढील तपास लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया म्हेत्रे या करत आहेत. तिकोनापेठ येथे घडलेल्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून सर्वत्र संतापाची लाट उसळली आहे.

इतर बातम्या