Breaking news

लोणावळा शहर काँग्रेसच्या अध्यक्षपदी माजी नगराध्यक्ष राजू गवळी यांची निवड जाहीर

लोणावळा : लोणावळा शहर काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी माजी नगराध्यक्ष राजू गवळी यांची निवड जाहीर करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाच्यावतीने पत्रकार परिषद घेत याबाबतची माहिती देण्यात आली. मागील वर्षभरापासून लोणार शहर काँग्रेसचे अध्यक्षपदी रिक्त होते. प्रभारी अध्यक्ष म्हणून मागील दोन-तीन महिन्यांपासून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस देखील कवीश्वर हे कामकाज पाहत होते. काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ पदाधिकारी व कार्ड कमिटी यांच्या शिफारशी नंतर पक्षाकडून गवळी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करत त्यांची निवड जाहीर केली आहे. 

     पत्रकार परिषदेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस निखिल कवीश्वर, ज्येष्ठ पदाधिकारी वसंत भांगरे, कम्मूभाई जस्दनवाला, बाबूभाई शेख, सुधीर शिर्के, जे.बी. सिंग बक्षी, तालुका महिला अध्यक्षा पुष्पाताई भोकसे, सिंधुताई कवीश्वर, भिकोबा दादा लोंढे, जितेंद्र कल्याणजी, जाकीर शेख, सूर्यकांत औरंगे आदी उपस्थित होते.

इतर बातम्या