Breaking news

MLA SUNIL SHELKE l भुशी डॅम येथील पर्यटकांवरील बंदी मागे घ्यावी; आमदार सुनील शेळके यांची पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानसभेत मागणी

लोणावळा, 9 जुलै : वर्षाविहारासाठी पर्यटकांचे मुख्य आकर्षण असलेल्या भुशी डॅम येथे दोन दिवसांपासून पर्यटकांना लागू करण्यात आलेली प्रवेश बंदी मागे घेण्याबाबत शासनाने जिल्हाधिकारी व रेल्वे खात्याला सूचना द्याव्यात, अशी जोरदार मागणी मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी आज (मंगळवारी) विधानसभेत केली.

     लोणावळ्याच्या भुशी डॅम परिसरात घडलेल्या दुर्घटनेनंतर जिल्हाधिकारी व रेल्वे खात्याने केलेल्या कारवाईचे तीव्र पडसाद विधानसभेतही उमटले. या कारवाईच्या विरोधात आमदार शेळके यांनी आवाज उठवला.

व्हॉट्स अप ग्रुप जॉईन करा व बातम्यांच्या अपडेट मिळवा, कधीही.. कुठेही...

      आमदार शेळके म्हणाले की, भुशी डॅमपासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या धबधब्यात वाहून गेल्यामुळे पाच जणांना मृत्यू झाला ही घटना दुर्दैवी होती. या दुर्घटनेनंतर जागेची कोणतीही शहानिशा न करता दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या भुशी डॅम येथील विक्रेत्यांच्या टपऱ्या व दुकानांवर जिल्हाधिकारी व रेल्वे प्रशासनाने केलेली कारवाई अन्यायकारक होती. त्यानंतर दोन दिवसांपासून या ठिकाणी पर्यटकांना करण्यात आलेली प्रवेश बंदी चुकीची असून ती त्वरित मागे घेण्याबाबत शासनाने संबंधितांना सूचना कराव्यात. भुशी डॅमच्या पायऱ्यांवर पर्यटकांना पुन्हा परवानगी द्यावी. त्या ठिकाणी स्थानिक भूमिपुत्र विक्रेते नियमांचे पालन करुन व्यवसाय करतील,अशी माहिती आमदार शेळके यांनी यावेळी दिली.

महत्वाच्या बातम्या वाचा

तळेगाव नगर परिषदेचे मुख्याधिकारी एन.के.पाटील यांचे निलंबन

टायगर पॉईंट येते हुक्का विकणाऱ्या दोघांवर लोणावळा ग्रामीण पोलिसांची कारवाई

मावळ तालुक्यातील राजपुरी गावातील ईशिता शिंदे आठवी शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात 13 वी

मुसळधार पावसाच्या इशाऱ्यानंतर पुणे जिल्हाधिकारी यांनी पुणे जिल्ह्यातील सर्व शाळांना मंगळवारी जाहीर केली सुट्टी

इतर बातम्या