Lonavala Sport news l मावळ तालुक्यातील तायकोंदो खेळाडूंचा राष्ट्रीय स्पर्धेत डौलदार विजय; 4 पदकांची कमाई

लोणावळा : नाशिक येथे 25 ते 30 एप्रिल दरम्यान पार पडलेली इंडिया तायकोंदो फेडरेशन कप 2025 ही राष्ट्रीय तायकोंदो स्पर्धा मावळ तालुक्यातील खेळाडूंनी गाजवली. लोणावळ्यातील मावळ तालुका तायकोंदो अकॅडमीत प्रशिक्षण घेणाऱ्या खेळाडूंनी महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करताना 2 सुवर्ण आणि 2 रौप्य अशी एकूण 4 पदके जिंकत तालुक्याचे आणि राज्याचे नाव उज्वल केले.
या स्पर्धेतील यशामागे मुख्य प्रशिक्षक मास्टर विक्रम बोभाटे व मार्गदर्शक संस्कृती लेंडघर यांचे मोलाचे योगदान लाभले. यशस्वी खेळाडूंना मावळ तालुका तायकोंदो अकॅडमीचे अध्यक्ष श्री. गणेशभाऊ गवळी, सचिव हर्षल होगले, खजिनदार रमेश विश्वकर्मा, तसेच अमोल गायकवाड आणि रवींद्र भोईने यांनी शुभेच्छा दिल्या.
पदक विजेते खेळाडू :
- कु. आराध्या गायकवाड (23 किलो गट) – सुवर्ण पदक
- कु. मल्हार लेंडघर (29 किलो गट) – सुवर्ण पदक
- कु. अननय नायकावकर (23 किलो गट) – रौप्य पदक
- कु. गायत्री चाको (42 किलो गट) – रौप्य पदक
या यशामुळे मावळ तालुक्यातील तायकोंदो खेळाडूंमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी स्पर्धांसाठी ही कामगिरी प्रेरणादायी ठरणार आहे.