पुणे जोधपूर एक्सप्रेस आज पासून दररोज धावणार; लोणावळा रेल्वे स्थानकावर राजस्थानी बांधवांच्या वतीने गाडीचे स्वागत

लोणावळा : राजस्थानी बांधवांच्या अनेक दिवसाच्या मागणीला यश आले आहे. पुणे जोधपुर एक्सप्रेस आज तीन मे पासून दररोज धावणार आहे. त्यामुळे लोणावळा पुणे मुंबई या परिसरामध्ये व्यवसायानिमित्त आलेल्या राजस्थानी बांधवांना आपल्या गावाकडे जाण्यासाठी व गावाकडून पुन्हा शहरांमध्ये येण्यासाठी या गाडीचा निश्चितच मोठा उपयोग होणार आहे. लोणावळा रेल्वे स्थानकामध्ये आज ही गाडी आली असताना गाडीच्या इंजिनची पूजा करण्यात आली तसेच गाडीचे चालक व गार्ड यांचा चिक्की व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी नगरसेवक बाळासाहेब जाधव, मांगीलाल जैन, ललित ओसवाल, ललित सिसोदिया, महेंद्र ओसवाल, भरत भाई कुमावत, भरत ओसवाल, रमेश शेठ राठोड, संतोष चोरडिया, नारायण शेठ पुरोहित, रामदेव बाबा भक्त मंडळाचे सदस्य उपस्थित होते. सदरची गाडी सुरू केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव, राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, राजस्थान पालीचे खासदार पी.पी. चौधरी, मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांचे देखील यावेळी आभार व्यक्त करण्यात आले.