Tree plantation l देहू नगरपंचायतीच्या वतीने अभंग गाथा पार्क मध्ये पर्यावरण दिना निमित्त वृक्षारोपण

देहूगाव : देहूगाव नगरपंचायतीच्या वतीने येथील गारायरानात विकसित केलेल्या ऑक्सिजन पार्क व अभंग गाथा पार्क मध्ये पर्यावरण दिनाचे औचित्यसाधत नव्याने पदभार स्विकारलेले मुख्य कार्यकारी अधिकारी चेतन कोंडे, नगराध्यक्षा पूजा दिवटे व नवनिर्वाचित उपनगराध्यक्षा प्रियंका मोरे यांच्या हस्ते देशी वृक्षांची लागवड करण्यात आली. तसेच वृक्षसंवर्धानाबाबतची प्रतिज्ञा देखील घेतली.
या उपक्रमामध्ये विविध संस्थाचे व खाजगी कंपन्या शैक्षणिक संस्था यांचे सहकार्य घेण्यात आले. याप्रसंगी वृक्षदायी संस्थेचे अध्यक्ष शिवाजी महाराज मोरे, सचिव संतोष हगवणे, गटनेते योगेश परंडवाल, नगसेवक आदित्य टिळेकर, अधिक्षक प्रियंका कदम, ज्ञानेश्वर शिंदे, सुरेद्र आंधळे, कविता पाटील, केवश पिनाटे, धनंजय नायकवडे, रामदास भांगे, सर्व कर्मचारी उपस्थित होते. महेद्र लॉजिस्टिक कंपनीचे कर्मचारी व अधिकारी, अभंग संस्थेचे शाळेचे सचिव विकास कंद, सुहास पाटील, सोमेश्वर प्रसारक मंडळाचे संस्थापक अंकुश बोडके, पुणे विद्यापिठाचे माजी कुलसचिव पी.बी.कुभार आदी उपस्थित होते.