
Get in on
लोणावळा : भारत सरकारने लागू केलेली HSRP (High Security Registration Plate) प्रणाली ही वाहने अधिक सुरक्षित ठेवण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. ही प्लेट वाहन चोरी, बनावट नंबर प्लेट आणि इतर गैरप्रकारांना आळा घालण्य�
लोणावळा : सिंहगड शिक्षण संस्थेच्या सिंहगड पब्लिक स्कूल, लोणावळा येथे आज ६६ वा महाराष्ट्र दिन आणि आंतरराष्ट्रीय कामगार दिन अत्यंत उत्साहात व राष्ट्रभक्तिपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
लोणावळा : मुंबई पुणे महामार्गावर खंडाळा बॅटरी हिल या ठिकाणी एका भरधाव वेगातील ट्रकचालकाने समोर जाणाऱ्या एका कारला मागून जोरात धडक दिली. सदर कार ही समोरून येणाऱ्या दुसऱ्या कारवर आदळल्याने झालेल्या भीषण अपघातामध्ये तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून 14 जण किरकोळ जखमी झाले आहेत. रविवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. सागर पांडुरंग इंगुळकर (राहणार पुणे) यांनी याप्रकरणी लोणावळा शहर पोलीस ठाण्यामध्ये अपघाताची फिर्याद दिली आहे. लोणावळा शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रक नंबर GJ 63 BT6701 हा पुण्याहून मुंबईच्या दिशेने जात असताना चालकाने भरधाव वेगात समोर जाणारी इनोव्हा कार नंबर MH 19 BG 8067 हीला मागून जोरात धडक दिली, त्या धडकेमुळे सदरची इनोव्हा गाडी समोरून येणारी एर्टिगा कार नंबर MH 12 UC 2800 हिला जाऊन धडकल्याने हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये प्रिया सागर इंगुळकर (राहणार शुक्रवार पेठ, टिळक रोड, पुणे), निलेष संजय लगड (वय 42 वर्षे), श्राव्या निलेश लगड (वय 12 वर्षे दोन्ही रा. सदशिवपेठ, पुणे) यांचा गंभीर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला. तर एर्टिगा कारमधील शस्यु, रूद्राक्ष, अषिका मोगल, आरव मोगल, अर्ष लगड, आरसित लगड यांना हाता पायाला व खांदयाला किरकोळ दुखापत झाल्या असून मुक्का मार लागलेला आहे. तर इनोव्हा कार मधील प्रवासी अष्वीनी रमेष जाडकर (वय 43 वर्षे), ओमकेश रमेश जाडकर (वय 22 वर्षे), सुमित तुकाराम कदम (वय 24 वर्षे), पुष्कार लक्ष्मण शेळकंदे (वय 25 वर्षे), जिगनेश रमेश जाडकर (वय 12 वर्षे), संजय नामदेव वाल्हेकर (वय 42 वर्षे), विमल नामदेव वाल्हेकर (वय 69 वर्षे सर्व रा. भिंवडी जि. ठाणे) हे किरकोळ जखमी झाले आहेत. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून पळून गेला आहे. याप्रकरणी लोणावळा शहरचे पोलीस निरीक्षक सुहास जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल लाड पुढील तपास करत आहेत.
पवनानगर : मावळ तालुक्यातील ऐतिहासिक मौजे शिळींब गावातील जागृत देवस्थान श्री काळभैरवनाथ देवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा बुधवार (दि. 30 एप्रिल) रोजी अक्षय्य तृतीयाच्या शुभमुहूर्तावर विविधा धार्मिक कार्यक्रमांसह व हजारो भाविकांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला. समस्थ ग्रामस्थ मंडळी शिळींब यांच्या माध्यमातून नूतन मंदिराच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त दोन दिवसीय विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. बुधवारी आयोजित कीर्तन सोहळ्यास आमदार सुनील शेळके यांनी देखील उपस्थिती दाखविली होती. गेली दोन वर्षे ग्रामस्थ, देणगीदार, समाजातील अनेक दानशूर मंडळी आणि आमदार सुनील शेळके यांच्यासह इतर लोकप्रतिनिधींच्या विशेष सहयोगाने ग्रामदैवत काळभैरवनाथ महाराजांचे मंदिर साकार झाले आहे. संपूर्ण दगडी बांधकाम असलेले हे मंदिर अत्यंत आकर्षक व सुंदर असून भाविकांच्या मनाला समाधान देणारे आहे. ग्रामदैवताच्या मंदिराचे बांधकाम पूर्ण झाल्यानंतर त्याच्या भव्य लोकार्पण सोहळ्याचे नियोजन समस्थ ग्रामस्थ मंडळी शिळींब यांनी केले. त्यानुसार मंगळवार (दि. 29) आणि बुधवार (दि. 30) अशा दोन दिवसीय कालावधीत अनेक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले होते. मंदिर कळसाची भव्य मिरवणूकनूतन मंदिरावर बसविण्यात येणारे कळस खास अहमदनगर येथून घडवून आणले होते. या कळसांची मंगळवारी भव्य मिरवणूक गावाच्या वेशीवरून काढण्यात आली. यावेळी संपूर्ण गावातील महिला भगिनी डोक्यावर मंगल कशल घेऊन मिरवणूकीत सहभागी झाल्या होत्या, तर गावातील पुरुष मंडळी, लहान थोर, अबालवृद्ध सारेच मिरवणुकीत सहभागी झाले होते. ढोल-ताशा, लेझीमच्या गजरात संपूर्ण गावातून कळस फिरवून भव्य मिरवणुक काढण्यात आली. त्यानंतर महाप्रसादाने पहिल्या दिवसाच्या कार्यक्रमाची सांगता झाली.शुभमुहूर्तावर कलश रोहणअक्षय्य तृतीयाच्या दिवशी सकाळी देवाचा महाअभिषेक संपन्न झाल्यानंतर कार्यक्रमास सुरूवात झाली. प्रत्यक्ष मंदिराची वास्तूशांती आणि कलशारोहण होणार असल्याने सकाळपासूनच गावात चैतन्याचे वातावरण होते. देवाचा अभिषेक झाल्यानंतर ब्राह्मणवृदांच्या उपस्थितीत होमहवन आदी विधिवत वास्तूशांती करण्यात आली. त्यानंतर सुमुहूर्तावर मंदिराच्या कळसाच्या शिखरावर मंगल कलश स्थापित करण्यात आला. यावेळी उपस्थित हजारो कालभैरवनाथ भक्तांनी, नागरिकांनी 'नाथ सायबाच्या नावानं चांगलभलं'चा गजर केला.विविध धार्मिक कार्यक्रममंदिराच्या शिखरावर मंगल कलश स्थापन केल्यानंतर विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. उपस्थित भाविकांना दुपारी महाप्रसाद वाटप केल्यानंतर नाथांचे भराड कार्यक्रम झाला, त्यानंतर हरिपाठ होऊन कीर्तन सोहळ्यास प्रारंभ झाला. जीर्णोद्धार सोहळ्यानिमित्त महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकार हभप शिवा महाराज बावस्कर यांची कीर्तन आयोजित करण्यात आले होते. यावेळी पंचक्रोशीतील भाविक, मंदिरास देणगी दिलेले देणगीदार, पाहुणे मंडळी, ग्रामस्थ, भाविक, वारकरी असे साधारण तीन हजारहून अधिक भाविक उपस्थित होते. हभप शिवा महाराज यांच्या सुश्राव्य कीर्तनाने भाविक दंग झाले. कीर्तन सोहळा संपन्न होत असताना आमदार सुनील शेळके यांचे आगमन झाले. आमदार सुनील शेळके यांनी जीर्णोद्धार सोहळ्यास उपस्थित राहणार असल्याचे सांगितले होते. परंतु रात्री उशीरापर्यंत आमदार शेळके न आल्याने ग्रामस्थांचा हीरमोड झाला होता. परंतु कार्यक्रम संपत असताना आपले दिवसभरातील कार्यक्रम आटोपून आमदार महोदय गावात आले, यामुळे ग्रामस्थांमध्येही उत्साहाचे वातावरण आले. आपल्या छोटेखानी मनोगतात आमदार शेळके यांनी ग्रामस्थांना मंदिराच्या उर्वरित सभोवतालच्या कामासाठी निधी देण्याचे आश्वासन दिले.ग्रामस्थांचे चोख नियोजनदरम्यान दोन दिवसांच्या सोहळ्यानिमित्त शिळींब ग्रामस्थांनी चोख नियोजन केले होते. मंदिर उभारणीसाठी विशेष मेहनत घेतलेले पंच मंडळी, गावातील वडीलधारे आणि तरूण मंडळ यांनी एकोप्याने काम करून नवा आदर्श घालून दिला. दोन दिवस हजारो लोकांना अन्नदान करण्यात आले. सोबत होणाऱ्या प्रत्येक कार्यक्रामात शिस्तीचे दर्शन घडविले, याचे स्वतः आमदार सुनील शेळके यांनीही कौतुक केले. अखेर बुधवारी कीर्तन सांगता झाल्यानंतर महाप्रसाद आणि रात्री मावळ-मुळशीतील वारकऱ्यांनी केलेला हरीजागर याने दोन दिवसीय सोहळ्याची सांगता झाली.
चिंचवड | प्रतिनिधी : ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या लोकप्रिय विनोदी कार्यक्रमाने गेल्या सात वर्षांत प्रेक्षकांच्या मनात हसतं-हसवतं स्थान निर्माण केलं. संकटाच्या काळातही या कार्यक्रमाने लोकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवलं. त्याच स्वच्छ आणि शुद्ध विनोदांची परंपरा ‘गुलकंद’ चित्रपटातही पाहायला मिळते, असे प्रतिपादन अभिनेता प्रसाद ओक यांनी चिंचवड येथे एका विशेष कार्यक्रमात केले.दिशा सोशल फाउंडेशनतर्फे ‘निमित्त गुलकंदचे – दिलखुलास गप्पा हास्यजत्रा टीमसोबत’ या कार्यक्रमाचे आयोजन प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात करण्यात आले होते. या वेळी प्रसाद ओक, सचिन गोस्वामी, समीर चौघुले, सई ताम्हणकर, ईशा डे, शार्विल आगटे, गायिका सावनी रवींद्र हे मंचावर उपस्थित होते. लेखक-संवादक सचिन मोटे यांनी कलाकारांशी दिलखुलास संवाद साधला.कार्यक्रमात ‘गुलकंद’ चित्रपटाच्या निर्मितीचा प्रवास, चित्रिकरणातील मजेशीर अनुभव, कलाकारांचे किस्से, परस्पर टोकाच्या विनोदांचे फटाके यामुळे सभागृह हास्याच्या लाटांनी गाजले. सावनी रवींद्र यांनी ‘गुलकंद’चे शीर्षकगीत सादर करत रंगत वाढवली. ‘आमच्यात कोणीच नाही मंद, एक मेपासून पाहा गुलकंद’ या शार्विलच्या टप्प्यामुळे सर्वत्र हास्यकल्लोळ उसळला.कार्यक्रमाच्या वेळी राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या हस्ते ओक आणि चौघुले यांचा, तर चंद्ररंगचे संचालक विजय पांडुरंग जगताप यांच्या हस्ते सचिन गोस्वामी आणि सचिन मोटे यांचा सत्कार झाला. माजी महापौर मंगला कदम आणि अपर्णा डोके यांनी सई ताम्हणकर व ईशा डे यांचा गौरव केला. तसेच टपाल खात्यातून सेवानिवृत्त झालेले दिशाचे कार्याध्यक्ष राजेंद्र करपे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरिकांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली.या कार्यक्रमाला राहुल कलाटे, सचिन साठे, पृथ्वीराज साठे, अमित गावडे, समीर मासूळकर, राजेंद्र साळुंके, बळीराम जाधव, संतोष कांबळे, राजू गोलांडे, राजू बनसोडे, कांतीलाल गुजर, नितीन धुंदुके यांसारख्या विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती. नाना शिवले यांनी प्रास्ताविक केले आणि सूत्रसंचालन अक्षय मोरे यांनी केले. आभार सई ताम्हणकर यांनी मानले.कलाकारांच्या प्रतिक्रिया :समीर चौघुले: "२९ वर्षांच्या कारकिर्दीत ५००० हून अधिक नाट्यप्रयोग, १६ चित्रपट, पाच वर्षे ‘कॉमेडीची बुलेट ट्रेन’, आणि सात वर्षे ‘हास्यजत्रा’! ‘गुलकंद’मध्ये नायक म्हणून भूमिका करणं, हे निर्मात्यांचं धाडसच म्हणावं लागेल. हा अनुभव समृद्ध करणारा ठरला."सई ताम्हणकर: "कलाकाराने साच्यात अडकू नये. प्रयोगशील राहणं, स्वत:वर विश्वास ठेवणं आणि कामावर श्रद्धा असणं महत्त्वाचं आहे. ‘हास्यजत्रे’मुळे माझ्या व्यक्तिमत्त्वाचा एक वेगळा पैलू प्रेक्षकांसमोर आला."प्रसाद ओक: "माझ्या वाट्याला आलेली भूमिका लहान की मोठी यापेक्षा तिचं महत्त्व काय आहे हे माझ्यासाठी महत्त्वाचं असतं. 'कच्चा लिंबू'ने राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला. इंडस्ट्रीत टिकायचं असेल तर दर्जेदार काम केलं पाहिजे."सचिन गोस्वामी: "सिनेमा तयार करून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवणं ही खूप मोठी जबाबदारी आहे. संजय छाब्रिया आणि त्यांच्या ‘एव्हरेस्ट’ टीममुळे ‘गुलकंद’चे प्रमोशन उत्तम झाले."सावनी रवींद्र: "‘गुलकंद’मधील गाण्याला प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद खूपच उत्साहवर्धक आहे. हे गाणं ऐकताना एक वेगळीच आनंददायक अनुभूती मिळते."
खोपोली : कुस्ती महर्षी स्व. भाऊसाहेब कुंभार कुस्ती संकुलात आयोजित करण्यात आलेल्या विशेष स्वागत समारंभात रायगड जिल्ह्याचे नविन क्रीडाधिकारी प्रकाश वाघ यांचे, मुंबई पोलिस दलात नुकतीच नियुक्ती झालेल्या ओंकार निंबळे यांचे, तसेच महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील उपविजेता सोहेल शेख यांचे सन्मानाने स्वागत करण्यात आले. खालापूरचे उपविभागीय पोलिस अधिकारी विक्रम कदम यांच्या हस्ते व विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमात बोलताना जिल्हा क्रीडाधिकारी प्रकाश वाघ यांनी सांगितले की, “क्रीडा क्षेत्राचा सर्वांगीण विकास आणि सुविधा निर्माण करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. कुस्ती महर्षी भाऊसाहेब कुंभार यांच्या स्मरणार्थ उभारण्यात आलेल्या या कुस्ती संकुलातून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडू घडावेत, यासाठी यंत्रणा अधिक सक्षम करण्यात येईल.” त्यांनी केवळ अधिकारी म्हणून नव्हे, तर एक क्रीडाप्रेमी म्हणूनही योगदान देण्याचा निर्धार व्यक्त केला. उपविभागीय पोलीस अधिकारी विक्रम कदम यांनी विद्यार्थ्यांमध्ये वाढणारी क्रीडाप्रती रुची आणि मोबाईलच्या आहारी जाणाऱ्या पिढीला मैदानी खेळांकडे वळवण्याचे महत्व अधोरेखित केले. “ही पिढी शारीरिक मेहनतीसोबत शैक्षणिक क्षेत्रातही यशस्वी होत आहे, हे कौतुकास्पद आहे,” असे ते म्हणाले. कार्यक्रमाला खोपोली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शितल राऊत, पोलीस उपनिरीक्षक पूजा चव्हाण, गोदरेज अँड बॉईज कंपनीचे CSR प्रमुख तानाजी चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते किशोर ओसवाल, महेंद्र सावंत यांनी देखील मनोगते व्यक्त केली. लायन्स क्लब ऑफ खोपोलीच्या माजी अध्यक्षा शिल्पा मोदी, भाजप शहराध्यक्षा अश्विनी अत्रे, कुस्ती अभ्यासक लोखंडे काका हे देखील व्यासपीठावर मान्यवर म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात कुस्ती संकुलाचे अध्यक्ष राजाराम कुंभार यांनी “आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्तीपटू घडवण्यासाठी अत्याधुनिक सुविधा विकसित करण्यावर भर दिला जाईल,” असे स्पष्ट केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन जगदीश मरागजे यांनी तर आभार प्रदर्शन गुरुनाथ साठेलकर यांनी केले. या प्रसंगी कुस्ती संकुलातील खेळाडू, पालकवर्ग आणि कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.